breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेराजकारण

आयएएस योगेश पाटील यांच्या मार्गदर्शन शिबिराला उत्फूर्त प्रतिसाद

  • युवा नेते लहू बालवडकर यांचा पुढाकार
  • स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन चळवळीला प्रोत्साहन

पुणे । प्रतिनिधी

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी तयारी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना योग्य आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन मिळावे, या हेतूने लहु बालवडकर सोशल वेलफेअर यांच्या सयुक्त विधमाने आज बालेवाडी येथील रॉयल रनभूमी मल्टीस्पोर्ट्स टर्फ येथे आयएएस अधिकारी योगेश पाटील यांच्या एक दिवसीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराला ३०० हुन अधिक तरुण व त्यांचे पालक उपस्थित होते. स्पर्धा परीक्षेत कशा प्रकारे सहभागी व्हावे, त्याचा अभ्यास कशा पद्धतीने करावा याचे अचूक आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन करण्यात आले. “IAS योगेश पाटील जी यांनी केलेले मार्गदर्शन आमच्या सारख्या उपस्थित मुलामुलींना भावी आयुष्यासाठी नक्कीच फायद्याचे आणि दिशादर्शक ठरेल यात शंका नाही” अशी भावना या वेळी उपस्थित काही तरुणांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाच्या वेळेस मा. सतीश पाटील(DY.CEO), लहु बालवडकर सोशल वेलफेअर चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button