breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

पिंपरी-चिंचवडचा ‘बाहुबली’ हरपला : आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन

पिंपरी : भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे दिर्घ आजारामुळे आज मंगळवारी सकाळी रुग्णालयात निधन झाले आहे.

चिंचवड मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप हे अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांची प्रकृती साथ देत नव्हती. अश्यातच पुन्हा त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

आज मंगळवारी सकाळी त्यांचे निधन झाल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे.  जगताप यांच्या निधनामुळे पिंपरी चिंचवड शहरात तसेच चिंचवड मतदार संघात शोककळा पसरली आहे.

पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते आमदार लक्ष्मण पाडुरंग जगताप (वय-५९) यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी अश्विनी, कन्या एश्वर्या, बंधू माजी नगरसेवक शंकर आणि विजूअण्णा जगताप असा मोठा परिवार आहे. शहराच्या राजकारणातील ढाण्या वाघ गेल्याची भावना गेल्याची भावना व्यक्त होत आहे. आमदार जगताप यांच्या निधनाने शहरावर शोककळा पसरली आहे.

शहराच्या राजकारणात गेली ३५ वर्षे चार वेळी नगरसेवक, चार वेळा आमदार राहिलेले. आमदार जगताप यांच्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेत २०१७ मध्ये भाजपाची एकहाती सत्ता आली होती. आता जगताप यांच्यासारखा मोठा आधारस्तंभ निखळल्याने भाजपाला पोरकेपण आले आहे.

आमदार जगताप हे गेली दोन वर्षांपासून आजारी होते. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांची तब्बेत खालवत गेली. मार्च च्या शेवटच्या आठवड्यात कुटुंबियांनी उपचारासाठी त्यांना अमेरिकेत नेले होते. एप्रिल २०२२ मध्ये ते पुन्हा मायदेशी परतले. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आले. नंतरच्या काळात त्यांची तब्बेत अधिक चिंताजनक झाली. प्रबळ इच्छाशक्ती मुळे अखेर पर्यंत त्यांनी मृत्युशी दोन हात केले. डॉक्टरांनी अगदी शर्थीचे प्रयत्न केले, पण अखेर सर्व उपाय संपले आणि त्यांची प्राणज्योत मालवली.

पिंपरी चिंचवडच्या राजकारणातील स्थानिक दमदार आमदार म्हणून लक्ष्मणभाऊ यांच्याकडे पाहिले जायचे. १९८६ मध्ये ते प्रथम नगरसेवक झाले. नंतर स्थायी समिती अध्यक्ष होण्याची संधी त्यांना मिळाली. सन २००० मध्ये ते शहराचे महापौर होते. पुढे हवेली विधानसभेसाठी प्रबेळ दावेदार म्हणून त्यांचे नाव घेतले जात होते, पण विलास लांडे यांना संधी मिळाली होती. नंतर विधान परिषदेसाठी पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकित अपक्ष उमेदवारी करून त्यांनी काँग्रेसचे चंदूकाका जगताप यांचा पराभव केला होता. राज्यात ती निवडणूक खूपच गाजली होती. २००९ मध्ये चिंचवड विधानसभेसाठी त्यांनी अपक्ष उमेदवारी करून शिवसेनेचे आताचे खासदार श्रीरंग बारणे यांचा पराभव केला आणि विजयश्री खेचून आणली होती. नंतर मावळ लोकसभा मतदारसंघातून शेकापचे उमेदवार म्हणून त्यांनी अत्यंत कडवी झूंज दिली, पण तिथे श्रीरंग बारणे हे शिवसेनेकडून विजयी झाले. नंतरच्या काळात बदलती राजकिय समिकरणे लक्षात घेऊन त्यांनी राष्ट्रवादी सोडून सरळ भाजपामध्ये प्रवेश केला आणि चिंचवड विधानसभेतून आमदारकी केली. २०१९ मध्येही ते मोठ्या मताधिक्याने जिंकले आणि चौथ्यांदा आमदार झाले. २०१७ मध्ये अजित पवार यांच्या ताब्यातील पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्व सूत्रे केवळ आमदार जगताप यांच्यामुळे भाजपाकडे आली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आमदार जगताप यांचे नाव मंत्री पदासाठी आघाडीवर होते. आता त्यांच्या निधनामुळे भाजपा पुढे नेतृत्वाचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या निधनावर सर्व राजकिय पक्षांच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

सांगवी येथील गणेश को-ऑपरेटिव्ह बँक, न्यू मिलेनियम स्कूल, प्रतिभा कॉलेज ऑफ सायन्स एन्ड कॉमर्स आदी संस्थांचे ते संस्थापक होते. पतंजली संस्था, हरिद्वारचे ते संस्थापक सदस्य होते. शहरातील अनेक संस्था, संघटनांचे ते आधारस्तंभ होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button