breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“उर्फीचा नंगानाच आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही”; चित्रा वाघ

उर्फीचे प्रताप थांबले नाहीत तर तिला दिसेल तिथे थोबडवणार

पुणे : सोशल मीडिया स्टार उर्फी जावेद भन्नाट कपड्यांवरून नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपासून उर्फी जावेदच्या विरोधात भाजप नेत्या चित्रा वाघ चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. असा नंगानाच आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही, असं म्हणत चित्रा वाघ यांनी उर्फीवर पुन्हा एकदा पोलीस कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सार्वजनिक ठिकाणी असे चाळे आम्ही चालू देणार नाही. टोकाची भूमिका घेऊ, शेवटपर्यंत लढा देऊ, पण उर्फीला धडा शिकवू. तिच्यावर कारवाई करण्यासाठी मी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतलीये. आता तरीही उर्फीचे प्रताप थांबले नाहीत तर तिला दिसेल तिथे थोबडवणार, असा इशारा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीला दिला आहे.
उर्फीचा असला नंगानाच खपवून घेणार नाही. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार चालला आहे. तुम्ही चार भिंतीच्या आत काय करता हा तुमचा खाजगी प्रश्न आहे. पण मुंबईच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी असा नंगटनाच जर कुणी करत असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही. यावेळी आम्ही पोलिसात तक्रार केली आहेच. व्यक्तीस्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, पण यावर कारवाई व्हायलाच हवी, असं चित्रा वाघ म्हणाल्या.
तिने ज्या भाषेत ट्वीट केलंय ते सांगतानाही मला लाज वाटते आहे. मी स्वतः पोलिसांत केलेल्या तक्रारीचा पाठपुरावा करणार आहे. आज ट्वीट केलंय तिने, पण उद्या मला जर कुठे भेटली तर मी पहिले तिला थोबडवून काढेन आणि मग ट्वीट करेन. काय व्हायचं असेल ते होऊद्या, पण आम्ही महाराष्ट्रात असा नंगानाच चालू देणार नाही. सगळ्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा आम्ही आदर करतो म्हणून कुणीही नाममात्र कपडे घालून रस्त्यावर फिरायचं. असले चाळे आम्ही चालू देणार नाही, असंही चित्रा वाघ म्हणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button