breaking-newsTOP NewsUncategorizedआरोग्यताज्या घडामोडीपुणे

पालकांनो काळजी घ्या : मंकीपॉक्ससारखी पुरळ;  मुलांमध्ये टोमॅटो फिव्हर संक्रमणाचा धोका अधिक…!

पुणे : देशात कोरोना आणि मंकीपॉक्सनंतर आता टोमॅटो फिव्हर वेगाने पसरत आहे. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाने चिंता व्यक्त केली  आहे.  टोमॅटो फिव्हर एन्टरोव्हायरसमुळे होतो. मुलांना टोमॅटो फिव्हर हा आजार होणे म्हणजे चिकनगुनिया किंवा डेंग्यू तापाचा परिणाम देखील असू शकतो असे तज्ज्ञ सांगतात.

केरळमध्ये टोमॅटो फिव्हरची 82 प्रकरणे समोर आली आहेत. तर, ओडिशात यामुळे 26 मुले आजारी पडली आहेत. या सर्वांचे वय 9 वर्षांखालील आहे, असे लॅन्सेट रेस्पिरेटरी जर्नलच्या अहवालात म्हटलं आहे.

टोमॅटो फिव्हर म्हणजे काय?

टोमॅटो फिव्हर किंवा टोमॅटो फ्लू हा हात, पाय आणि तोंडाच्या रोगाचा (HFMD) एक प्रकार मानला जातो. याचे नाव टोमॅटो फिव्हर आहे कारण या आजारात रुग्णाच्या शरीरावर टोमॅटोच्या आकाराचे आणि रंगाचे फोड किंवा पुरळ येतात,अशी माहिती टाईम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केली आहे.

टोमॅटो फिव्हरची लक्षणे

-लॅन्सेटच्या अहवालानुसार, टोमॅटो फिव्हरमध्ये मंकीपॉक्सप्रमणे शरीरावर पुरळ उठतात.

– ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते अशा मुलांची या आजारामुळे संक्रमित होण्याची शकयता अधिक असते .

-टोमॅटो फिव्हरच्या लक्षणांमध्ये ताप, स्नायू दुखणे, थकवा, सांधेदुखी, खाज सुटणे, उलट्या इत्यादींचा समावेश आहे.

हा फिव्हर कसा पसरतो?

-टोमॅटो फिव्हरचे पहिले प्रकरण 6 मे रोजी केरळमधील कोल्लममध्ये आढळून आले.

-1 ते 5 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये याची लक्षणे दिसायला सुरुवात झाली आहे.

– सध्या हा आजरकेवळ मुलांमध्येच अधिक पसरत आहे. याची अनेक कारणे असू शकतात, जसे की स्वछता नसलेल्या ठिकाणी राहणे आणि घाण गोष्टींना स्पर्श करणे.

– मुले खेळणी, अन्न आणि कपड्यांपासून अनेक गोष्टी शेअर करतात, ज्यामुळे संसर्ग पसरण्याचा धोका वाढतो. याचा अर्थ इतर व्हायरल इन्फेक्शन्सप्रमाणेच हा आजार देखील संपर्कातूनच पसरण्याची शक्यता अधिक असते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button