ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पिंपरी-चिंचवडकरांची वाहन खरेदीला पसंती

साडेपाच हजार वाहनांची झाली खरेदी

पिंपरी : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पिंपरी-चिंचवडकरांनी वाहन खरेदीला पसंती दिली आहे. शहरात नव्याने साडेपाच हजार वाहनांची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक २ हजार ९६२ दुचाकींची संख्या आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर वाहन घरी नेण्यासाठी अगोदरच बुकिंग करण्यात आले होते. शुभमुहूर्तावर वाहन घरी आणण्यासाठी शोरूममध्ये रेलचेल होती. गुढीपाडव्याच्या दिवशी वाहन, वस्तू खरेदी शुभ मानली जाते. १ ते ९ एप्रिल या नऊ दिवसात पिंपरी- चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयात ५ हजार ५०० वाहनांची नोंद झाली आहे. यामध्ये २ हजार ९६२ दुचाकी, तर १ हजार ८५८ चारचाकींची संख्या आहे. मालवाहतूक आणि इतर वाहनांचा त्यानंतर क्रमांक लागतो.

वाहन खरेदीसाठी आकर्षित करण्यासाठी यंदा विक्रेत्यांकडून आकर्षक सवलती जाहीर करण्यात आल्या होत्या. दुचाकीवर हेल्मेट, अॅक्सेसरीज मोफत देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पिंपरी-चिंचवडमध्ये दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सरासरी चार ते पाच हजार वाहनांची नोंद होते. गतवर्षी १४ ते २१ मार्च या गुढीपाडव्याच्या लगतच्या आठ दिवसांत ४ हजार ८९९ वाहनांची नोंद झाली होती.

दुचाकी – २,९६२
चारचाकी – १,८५८
रिक्षा – १४३
मालवाहतूक वाहने – २९३
इतर वाहने – २३९

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button