breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पुण्यात बिकट परिस्थितीतही मास्क न वापरणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त

पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालाली आहे. जिल्ह्याची कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६३ हजारांपेक्षा जास्त आहे. तर १५०० च्या पुढे मृत्यूचा आकडा पोहोचला आहे. असे असूनही, नागरिक नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. पुण्यात १० दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. मात्र, अशा बिकट परिस्थितीतही मास्क न वापरणाऱ्या नागरिकांची संख्या काही कमी नाही

जिल्ह्यात मास्क न वापरणाऱ्या तब्बल ६७९९ नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत २० लाख ४७ हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यात जिल्हा परिषद प्रशासनाने ही कारवाई केली. त्याचबरोबर जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकणांऱ्यांवरही कारवाई केली जात आहे.

जिल्ह्यातील हवेली तालुक्यात सर्वाधिक १७८२ नागरिकांवर कारवाई करण्यात आली. इंदापूर तालुक्यात ८९९ कारवाया केल्या. दौंड तालुक्यात ८७४ कारवाई, बारामती ५७३ कारवाया करण्यात आल्या. तर, जुन्नर ४५६ कारवाया, मुळशी ५४० कारवाया, शिरुर ४३५ कारवाया झाल्या. त्याचबरोबर वेल्हे १३२ कारवाया, भोर १०२ आणि आंबेगाव तालुक्यात ३९२ कारवाया करण्यात आल्या आहेत.

याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील ट्विट करत माहिती दिली होती. किती जणांवर कारवाई केली याबाबत सपशिल त्यांनी दिला आहे. तसेच, सुप्रिया सुळे यांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना सॅनिटायझर वापरणे, सोशल डिस्टन्स यासोबतच मास्कचा वापर करा. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी हे आवश्यक आहे, अशी विनंती देखील केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button