breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
महापालिकेत महापौरांच्या हस्ते ध्वजारोहन; अधिकारी, कर्मचा-यांची सलामी
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते आज सकाळी ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, संतोष पाटील आदींनी राष्ट्रध्वजाला अभिवादन केले.
यावेळी राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर सर्वांनी राष्ट्रगीत गाऊन तिरंगी ध्वजाला सलामी दिली. त्यानंतर महापौर ढोरे, आयुक्त हर्डीकर आणि अन्य अधिकारी, कर्मचा-यांनी मनोगत व्यक्त केले. आपल्या मनोगतातून त्यांनी राष्ट्रभक्तीची भावना वाढीस लागण्यासाठीचे मार्गदर्शन केले.