YCMH : रेबीज लस उपलब्ध करा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करू

- युवासेनेची वैद्यकीय विभागाकडे मागणी
- शिवसेना स्टाईल आंदोलनाचा दिला इशारा
पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात (वायसीएम) औषधांचा तुटवडा भासत आहे. रेबीज लस उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल सुरू आहेत. या लसीसाठी खासगी औषध विक्रेत्यांकडून नागरिकांची अक्षरशः लुट सुरू आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने तातडीने औषधे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी युवा सेनेतर्फे करण्यात आली आहे.
महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांना युवा सेनेच्या पदाधिका-यांनी आज रितसर मागणीचे पत्र दिले. त्यात म्हटले आहे की, यशवंतराव चव्हाण रुग्णालयात चाकण, लोणावळा, मुळशी भागाच्या ग्रामीण पट्ट्यातून उपचार घेण्यासाठी नागरिक येत असतात. परंतु, रुग्णालयात सध्या औषधांचा तुटवडा असल्याचे निदर्शनास आले आहे. रेबीज लस उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांचे हाल सुरू आहे, अशी माहिती आहे. तरी, महापालिकेने तातडीने औषधे उपलब्ध करून द्यावीत, अन्यथा शिवसेना स्टाईने आंदोलन करण्याचा इशारा युवा सेनेने दिला आहे.
मागणीचे निवेदन देताना युवा सेना जिल्हा समन्वयक रुपेश कदम, युवती सेना अधिकारी प्रतिक्षा घुले, विभाग संघटक निलेश हाके, सनी कड, ओंकार जगदाळे, सुरज पवार, रोहन पिसाळ, श्रेयस घुले, आदित्य पाटील आदी उपस्थित होते.





