अध्यात्म । भविष्यवाणीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

“लग्न सोहळा: खर्चाचा की विचारांचा?” या जिवंत देखाव्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद!

चिंतामणी मित्र मंडळचा लक्षवेधी पुढाकार : सामाजिक चिंताजनक वास्तावाला फोडली वाचा

पिंपरी-चिंचवड:  यंदा २३ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या चिंतामणी मित्र मंडळाने गणेशोत्सवाचे औचित्य साधत समाजप्रबोधनाचा संदेश देणारा “लग्न सोहळा – खर्चाचा की विचारांचा?” हा जिवंत देखावा सादर करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. मंडळाच्या सभासदांनीच साकारलेल्या या प्रभावी देखाव्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, देखावा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळत आहे.

या देखाव्यात पंकज फडणीस, दत्तात्रय हरपळे, भाग्येश अवधानी, सौ. उषा साळुंखे, मनीषा रांधवणे, सौ. अनघा अवधानी व कुमारी श्रुती फडणीस यांनी आपल्या सशक्त अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. देखाव्याचे लेखन मंडळाचे उपाध्यक्ष श्री. राजीव शेंडे यांनी केले असून, त्यांनी अतिशय नेमक्या शब्दांत सामाजिक वास्तवाला वाचा फोडली आहे.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंडळाने विविध सामाजिक उपक्रम राबवले असून, चार गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारणे हा त्यातील एक स्तुत्य उपक्रम ठरला आहे. त्याचप्रमाणे विविध वयोगटांसाठी खेळ, कला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या स्पर्धांचे आयोजन करून गणेशोत्सवाचा उत्सव अधिक रंगतदार करण्यात आला आहे.

मंडळाचे अध्यक्ष श्री. नीलेश आहेरसचिव श्री. दिलीप पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली चिंतामणी मित्र मंडळ सामाजिक जाणीव ठेवत गणेशोत्सव साजरा करत आहे. यावर्षीचा देखावा आणि उपक्रम हे मंडळाच्या समाजाभिमुख कार्याची साक्ष देणारे ठरले आहेत.

“आजच्या काळात लग्न हे दोन मनांचा मिलाप असावा, केवळ खर्चाचा आणि दिखाव्याचा सोहळा नव्हे. आपण समाजाला दिशा देणारे बनूया — विचारांची, संवेदनांची आणि सच्च्या माणुसकीची. हा देखावा केवळ एक सादरीकरण नाही, तर बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
श्री. नीलेश आहेर, अध्यक्ष, चिंतामणी मित्र मंडळ.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button