“आम्ही शंकर जगताप यांच्या सोबत” थेरगावकरांचा आवाज घुमला..!
थेरगाव गावठाण, पवार नगर परिसरात आमदार अश्विनी जगताप यांचा मतदारांशी संवाद

चिंचवड : थेरगाव येथे महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ आमदार अश्विनी जगताप यांनी थेरगाव गावठाण, पवार नगर परिसरातील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. या भेटीदरम्यान, त्यांनी मतदारांच्या समस्या समजून घेतल्या आणि त्यावर विचारमंथन केले. नागरिकांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी व विकासासाठी कार्यरत राहण्याचे आश्वासन दिले. या भेटींमध्ये त्यांनी शंकर जगताप यांनी केलेल्या विविध विकासकामांची माहिती देऊन, आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. तसेच, मतदारांनी शंकर जगताप यांना मत देऊन संधी दिल्यास परिसराचा सर्वांगीण विकास साधता येईल, असे आवाहन आमदार अश्विनी जगताप यांनी केले.
आमदार अश्विनी जगताप यांनी थेरगाव गावठाण भागातील सोसायटींना भेट देत मतदारांशी संवाद साधला. प्रभाग क्रमांक २३ थेरगाव, थेरगाव गावठाण, विघ्नहर्ता कॉलनी, दगडू पाटील नगर, पवार नगर, पडवळ नगर, जगताप नगर, समता हाउसिंग सोसायटी, रायगड कॉलनी, स्विस काऊंटी, कुणाल रेसिडेन्सी, संजीवनी हाउसिंग सोसायटी, भगवती पाम सोसायटींना त्यांनी भेट दिली.
हेही वाचा – मिशन विधानसभा: मावळच्या रणधुमाळीत ‘का’ झाले लहानगीला अश्रू अनावर? ‘‘व्हिडिओ व्हायरल’’
यावेळी माजी नगरसेविका मनीषा पवार, भाजपा महिला थेरगाव अध्यक्ष सोनालीताई गाडे, आरपीआय शहराध्यक्ष कुणाल व्हाळकर, सामाजिक कार्यकर्ते तानाजी बारणे, संदीप गाडे, प्रमोद पवार, विनोद पवार विनोद मिरगणे, आकाश देवकर, शिवसेनेचे संतोष गुलाब बारणे, आकाश बारणे, प्रशांत सपकाळ यांच्यासह महायुतीची सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भारतीय जनता पक्ष तसेच महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
यावेळी “आम्ही तुमच्या सोबत आहोत” असा विश्वास उपस्थित नागरिकांनी दिल्याचं पाहायला मिळालं. या दौऱ्या दरम्यान मतदारांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. थेरगाव परिसराच्या विकासासाठी आम्ही शंकर जगताप यांनाच मोठ्या मताधिक्याने विजयी करू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.





