Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

उर्से गावात सुनील शेळके यांचे ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या उत्साहाने स्वागत!

पिंपरी : उर्से गावात मावळ विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार सुनील शेळके यांचा पुष्प वर्षाव करत स्वागत करण्यात आले. जनसंवाद दौरा या निमित्ताने सुनील शेळके यांनी आपल्या प्रचाराकरिता उर्से गावाचा दौरा केला. या दौरादरम्यान, उर्से गावातील ग्रामस्थांनी फुलांची उधळण करीत व रांगोळ्याच्या पायघड्या घालून तसेच ओवाळून उत्स्फूर्तपणे स्वागत केले.

सुनील शेळके हे मावळ मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी मैदानात उतरले आहे .त्यांना मावळ मतदार संघातून मोठ्या प्रमाणात मतदारांचा प्रतिसाद मिळत आहे. यानिमित्त सुनील शेळके यांनी जनसंवाद दौऱ्यादरम्यान उर्से गावाला भेट दिली असता, या गावातील नागरिकांनी त्यांचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले. तसेच विविध समस्या देखील त्यांना बोलून दाखविल्या.

हेही वाचा     –      ‘भारतीय जनता पक्षात ज्या नावांची चर्चा असते ते मुख्यमंत्री होत नाहीत’; विनोद तावडे यांचं विधान चर्चेत 

यावेळी बोलताना सुनील शेळके म्हणाले, गावाच्या विकासासाठी एकजुटीने प्रयत्न करा, माझ्याकडून जे शक्य होईल ते नक्कीच करण्याचा प्रयत्न केले करीन, असा विश्वास देखील सुनील शेळके यांनी व्यक्त केला.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button