Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोशी परिसरात वृक्षारोपण मोहीम उत्साहात

प्रा. कविता आल्हाट यांच्या पुढाकाराने पर्यावरण रक्षणाचा सकारात्मक उपक्रम

पिंपरी | महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा.कविता आल्हाट यांच्या वतीने मोशी परिसरातील विविध सोसायट्यांमध्ये वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली.

या उपक्रमात महिलांसह ज्येष्ठ नागरिक आणि युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी गुलमोहोर, अशोक, बदाम, सप्तपर्णी, पिंपळ, करंज अशा विविध जातींची झाडे प्रभागातील सोसायट्यांच्या आवारात लावण्यात आली. प्रत्येक सोसायटीतील नागरिकांनी उस्फूर्त सहभाग दर्शवून झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली.

कार्यक्रमात बोलताना प्रा. कविता आल्हाट म्हणाल्या, “वृक्ष हे जीवनाचे आधार आहेत. प्रदूषण वाढत असताना झाडे लावणे आणि त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे. प्राणवायूचा स्रोत असलेल्या झाडांचे संवर्धन ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. स्वच्छ, सुंदर आणि हिरवा प्रभाग घडवण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा.”

हेही वाचा      :        Honey Trap | प्रफुल्ल लोढा विरोधात बावधन पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल

पर्यावरणपूरक उपक्रमामुळे आदर्श…

या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण झाली आहे. सोसायट्यांमधील लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी हसतमुखाने सहभाग घेतल्यामुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण होते. या वृक्षारोपण उपक्रमात स्थानिक सामाजिक कार्यकर्ते, महिला मंडळांच्या सदस्य, युवक मंडळाचे प्रतिनिधी आणि विविध सोसायट्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल प्रा. कविता आल्हाट व त्यांच्या कार्यकर्त्यांचे नागरिकांनी कौतुक केले. ‘‘आपल्या परिसरात झाडे लावा, हिरवाई वाढवा!’’ असा संदेश देत अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पर्यावरणपूरक सामाजिक उपक्रमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आदर्श निर्माण केला आहे.

“वृक्ष ही निसर्गाची अमूल्य देणगी आहे. प्रदूषणमुक्त, स्वच्छ आणि हिरवा प्रभाग घडवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करणे हे आपले कर्तव्यच नाही, तर भविष्यासाठीची शाश्वत गुंतवणूक आहे.”

– प्रा. कविता आल्हाट, शहराध्यक्षा, राष्ट्रवादी महिला काँग्रेस.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button