Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वृक्ष संवर्धन विभागाचे शिलकी अंदाजपत्रक मंजूर

यंदाचा ५७ कोटी ३६ लाख ८६ हजार रुपयांचा अर्थसंकल्प; आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांची मंजुरी

पिंपरी | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वृक्षसंवर्धन विभागाचे आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या ५ कोटी ९ लाख रुपये शिल्लक रकमेसह आर्थिक वर्ष २०२५-२६ चे ५७ कोटी ३६ लाख ८६ हजार रुपयांचे सुधारित अंदाजपत्रक मंगळवारी स्थायी समिती व महापालिका सभेमध्ये सादर करण्यात आले. या अंदाजपत्रकास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात पार पडलेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा  :  आयुर्वेदाच्या माध्यमातून आता रोजगाराची संधी

महापालिकेच्या वृक्षसंवर्धन विभागाकडे वृक्षकर, वृक्षतोड लाकूड विक्री, अनुदान, देणगी, झाडतोड खर्च वसुली, रोपे विक्री, विनापरवाना झाडे तोडल्याबाबत नागरिकांकडून वसुल केलेली तडजोड रक्कम, महापालिका सेवा शुल्क आदी बाबींच्या माध्यमातून सुमारे ६२ कोटी ४६ लाख १० हजार ५०० रुपये जमा होणार आहेत. या जमा होणाऱ्या रकमेच्या शिल्लक रकमेसह २०२४-२५ चे सुधारित व २०२५-२६ च्या एकूण ५७ कोटी ३६ लाख ८६ हजार रुपयांच्या मुळ अंदाजपत्रकास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.

वृक्षसंवर्धन विभागाने सादर केलेल्या अंदाजपत्रकातील रक्कम विविध उपक्रम, विकासकामांसाठी खर्च करण्यात येणार आहे. त्यामध्ये कार्यालयीन खर्चासह फळाफुलांचे प्रदर्शन भरविणे, झाडांचे पुर्नरोरपण करणे, पिंजरे खरेदी व दुरूस्ती करणे, वृक्षगणना करणे, तार कुंपण देखभाल दुरूस्ती करणे, विविध उद्यानांची देखभाल दुरूस्ती करणे, गायरान व मोकळ्या जागांमध्ये वृक्षरोपण तसेच संवर्धन करणे, नर्सरी साहित्य खरेदी करणे आदी कामांचा समावेश आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button