Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपळे सौदागर येथे नाशिक फाटा ते वाकड बीआरटीएस मार्गावर ‘‘वाहतूक कोंडी’’

माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांची यांची उपाययोजना करण्याची मागणी

पिंपरी-चिंचवड: पिंपळे सौदागर येथे नाशिक फाटा ते वाकड बीआरटीएस मार्गावर ‘‘वाहतूक कोंडी’’ होत असल्याबाबत माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांचे गुरुवारी लक्ष वेधले. पिंपळे सौदागर मधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पीके चौक येथे अंडरपास तयार करावा अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

पिंपळे सौदागर मधील वाहतूक कोंडीसह विविध प्रलंबित प्रश्नांच्या मागण्यांसंदर्भात नाना काटे यांनी गुरुवारी आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आयुक्तांना लेखी निवेदन दिले आहे. यात त्यांनी स्वराज गार्डन चौक येथील गार्डनचे आरक्षण बदलून त्या ठिकाणी जलतरण तलाव व बॅडमिंटन हॉल उभारण्यात यावा. अशी मागणी देखील केली आहे.

पिंपळे सौदागर येथील वाहतूक कोंडी संदर्भात नाना काटे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.२८ रहाटणी पिंपळे सौदागर येथील नाशिक फाटा ते वाकड या बी आर टी ऐस मार्गावरील पी के चौक येथे नागरिकांना सततच्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या मार्गावर हिंजवडी, वाकड, पुणे येथे कामानिमित्ताने जाणाऱ्यांसाठी हा सोपा मार्ग असल्याने या मार्गाचा नागरिक मोठ्या प्रमाणात वापर करतात. तसेच जवळ असणार्या भोसरी, चाकण, खेड औद्योगिक परिसरातील मोठे मालवाहतूक करणारी वाहने देखील या मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्यामुळे पी के चौक येथे सातत्याने वाहतूक कोंडी होत असते आणि यामुळे आत्ता पर्यंत अनेक छोटे मोठे अपघात या चौकात झालेले आहेत. त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासामधून सुटका होण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

रहाटणी पिंपळे सौदागर येथील आरक्षण क्र. ३६१ मधील गार्डन वापराचे आरक्षण बदलून त्या जागी जलतरण तलाव व बॅडमिंटन हॉल तयार करावा.याचा फायदा पिंपळे सौदागर येथील २३० हून अधिक निवासी सोसायट्यांना होईल.त्याच बरोबर दिवसेंदिवस महानगरपालिकेतील हॉस्पिटल मध्ये वाढणाऱ्या अतिदक्षता बेडची मागणी लक्षात घेता सर्व महानगरपालिकेच्या हॉस्पिटल मधील बेडची संख्या वाढवावी, अशी आमची मागणी आहे.
– नाना काटे, माजी विरोधी पक्षनेते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button