TOP News । महत्त्वाची बातमीअध्यात्म । भविष्यवाणीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमुंबई

जागतिक महिला दिनानिमित्त मधुकर बच्चे युवा मंचच्यावतीने महिला-मुलींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात

चिंचवड ः ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त मधुकर बच्चे युवा मंचच्यावतीने तसेच डॉ. लाल पॅथ लॅब्स व पॉइंट ऑफ केअर बायोमेडिकल प्रा. ली. यांच्या सौजन्याने चिंचवड परिसरातील महिला-मुलींसाठी हिमोग्लोबिन, मधुमेह,रक्तदाब! आदी मोफत तपासण्या शिबीराचे चिंचवड येथे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास परिसरातील महिलांनी-मुलींनी मोठा सहभाग नोंदविला. महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य व भाजपा शहर सचिव मधुकर बच्चे यांच्या पुढाकाराने या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबरीरात सहभागी महिलांना महिलादिनी सन्मान म्हणून मधुकर बच्चे युवा मंचच्यावतीने गुलाब पुष्प देऊन महिलांचा गौरव करण्यात आला. या वेळी भाजपा शहर महिला अध्यक्षा उज्वला गावडे, रोहिणी बच्चे, सुषमा कोरे, सिमरन मौलवी, प्राध्यापिका माधुरी गुरव, अर्चना बच्चे, पूजा सराफ, छाया ढेपे, रंजना बच्चे, आदी मान्यवर महिलांनी शिबिरास येणाऱ्या सर्व महिलांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करून सन्मान केला.

सदर आरोग्य शिबीर पोपट बच्चे,सुधीर मगर, गिरीश हंपे, गणेश बच्चे,गणेश गावडे आदींनी यशस्वी करण्यास योगदान दिले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button