ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पारंपरिक वाद्यांच्या गजरात विद्यार्थ्यांनी केले बाप्पांचे स्वागत!

शिक्षण विश्व: न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गणेशोत्सव उत्साहात साजरा

पिंपरी-चिंचवड : थेरगाव येथील नामवंत न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये श्री गणेशाची प्रतिष्ठापना पारंपरिक वाद्यांच्या गजरात व विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागात मोठ्या थाटामाटात पार पडली. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये हिंदू संस्कृतीची जाणीव निर्माण करणारे उपक्रम परिसरात आदर्शवत ठरत आहेत

या विशेष प्रसंगी ढोल-ताशा आणि लेझीम पथकाच्या तालावर पारंपरिक पोशाखात सजलेल्या विद्यार्थ्यांनी भव्य मिरवणूक काढली. उत्साही गजरात श्री गणेशाची मूर्ती शाळेत आणून शाडू मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

हेही वाचा      :      पीओपी व शाडू मातीच्या मूर्तींची नोंद ठेवा

कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष विजय पवार ,उपाध्यक्ष निलेश पलघोमल यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. प्रतिष्ठापनेनंतर गणेश आरती झाल. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी शाळेत दरवर्षी शाडू मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते हे या संस्थेचे वैशिष्ट्य आहे.

मुख्याध्यापिका विद्या नाईक , विजयकुमार माने, यशवंत माने, रुपेश गोरे, वैभव हडप, जयेश लखन, रूपाली माने, निखत अन्सारी तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उस्फूर्त सहभाग नोंदवला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button