विधायक उपक्रम : इंद्रायणीनगर येथील महाआरोग्य शिबिराचा ३ हजार नागरिकांना लाभ

भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष शिवराज लांडगे यांचा पुढाकार
अमराई चॅरिटेबल ट्रस्ट सहकार्याने शिबिराचे आयोजन
पिंपरी । प्रतिनिधी
इंद्रायणीनगर येथे आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराचा लाभ परिसरातील ३ हजार १०३ नागरिकांना झाला, अशी माहिती भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष शिवराज लांडगे यांनी दिली.
भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अमराई चॅरिटेबल ट्रस्ट व शिवराजदादा लांडगे मित्र परिवाराच्या वतीने ‘संकल्प निरोगी आयुष्याचा’ या अभियानाअंतर्गत परिसरातील नामांकीत रुग्णालयांमार्फत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. इंद्रायणीनगर येथील सेक्टर नं. ७, द्वारका प्लॅटिनम सोसायटीजवळ महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन आमदार लांडगे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
शिवराज लांडगे म्हणाले की, यामध्ये हृदय रोग, किडणी विकार व प्रत्यारोपण, लीव्हर प्रत्यारोपण, गुडघे प्रत्यारोपण, हाडांचे व मणक्याचे आजार, कॅन्सर व शस्त्रक्रिया व केमोथेरेपी, दंतरोग, नेत्ररोग, मोफत श्रवणयंत्रे, मेंदुची शस्त्रक्रिया, आयुर्वेद उपचार, मुत्र मार्गाचा विकार, कान नाक घसा, रक्तदाब, शुगर तपासणी आदी तपासण्या तसेच सर्व आजारांवर आयुष्मान भारत योजनेअंतर्गत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. यासह लहान मुलांच्या हृदयावरील उपचार, फाटलेले टाळु व ओठांवरील शस्त्रक्रीया, दिव्यांगांसाठी मोफत साहित्य वाटप करण्यात आले.
नागरी आरोग्य रक्षणासाठी भाजपा कटिबद्ध : आमदार लांडगे
आमदार महेश लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी भाजपा कटिबद्ध आहे. शिवराज लांडगे यांनी घेतलेल्या महाआरोग्य शिबिरामुळे सर्वसामान्य नागरिकांना लाभ मिळणार आहे. कोरोना आणि वाढत्या आरोगय समस्यांच्या पार्श्वभूमीवर भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते लोकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत, याचे समाधान वाटते. सामाजिक क्षेत्रात शिवराज लांडगे यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे, अशा शब्दांत आमदार लांडगे यांनी कौतुक केले.