पिंपरी / चिंचवड

मंदिरात निघालेल्या महिलेचे पाउण लाखांचे मंगळसूत्र हिसकावले

पिंपरी l प्रतिनिधी

शेजारी राहणा-या महिलेसोबत मंदिरात जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील पाउण लाखांचे मंगळसूत्र दोन अनोळखी चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 15) रात्री साडेनऊ वाजता कृष्णानगर, चिंचवड येथे घडली.

अर्चना प्रकाश बागडे (वय 32, रा. म्हेत्रेवस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अर्चना या त्यांच्या शेजारी राहणा-या मंदा भुजबळ यांच्यासोबत कृष्णानगर येथील मारुती मंदिरात पायी चालत जात होत्या. त्यावेळी एका दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी फिर्यादी यांच्या गळ्यातील 75 हजार रुपये किमतीचे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. त्यानंतर आरोपी कस्तुरी मार्केटच्या दिशेने निघून गेले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button