चिखली-कुदळवाडीतील आरक्षण ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू!
अतिक्रमण कारवाईनंतर विकासकामांना गती : महापालिका प्रशासनाकडून शिबिराचे आयोजन

पिंपरी- चिंचवड : चिखली गावठाण मधील म.न.पा. शाळा मुले व मुली या ठिकाणी मौजे चिखली भागातील विकास आराखड्यातील रस्त्याची व आरक्षणाची जागा ताब्यात घेण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
गेले दोन दिवस सकाळी १०.०० वाजलेपासून ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत जमीन मालक/ विकसक जागा ताब्यात देणेसाठी उपस्थित होते व नगररचना विभागाने तयार केलेल्या नकाशा पाहून आपली जागा रस्त्याचे संपादनात येत असल्याची खात्री झालेनंतर कागदपत्रे प्रत्यक्ष सादर करुन जागेचा आगाऊ ताबा दिला व महानगरपालिकेच्या नगररचना विभाग व स्थापत्य विभागाने संयुक्तपणे ‘अ’ व ‘ब’ प्रपत्र जमीन मालकांना शिबिरामध्येच दिले.
हेही वाचा – कुदळवाडीतील लघु उद्योजकांच्या पुनर्वसनाची मागणी
दोन दिवसाचे शिबीरामध्ये रस्ते व आरक्षण यांचे एकूण ८०,६१८.०० चौ.मी. इतके क्षेत्र टी.डी.आर./ एफ.एस.आय.चे बदल्यात ताब्यात आले आहे. उर्वरित क्षेत्र ही लवकरच महानगरपालिकेच्या ताब्यात देण्याची तयारी जमीन मालकांनी दर्शविली आहे. काही कागदपत्रांची पूर्तता झालेनंतर उर्वरित जमीनी महानगरपालिकेच्या ताब्यात मिळणार आहेत.
या दोन दिवसाचे शिबीराचे आयोजन युक्त शेखर सिंह यांचे मार्गदर्शनाखाली केले होते. त्यामध्ये खालील अधिकारी/ कर्मचारी यांनी काम पाहिले. 1) उपसंचालक, नगररचना- श्री. प्रसाद गायकवाड, 2) सहाय्यक संचालक, नगररचना- श्री. संदेश खडतरे, 3) उपअभियंता- श्री. अशोक कुटे व श्री. विकास घारे, 4) कनिष्ठ अभियंता- श्रीम. वृशाली पाटील, श्री. रुकुपचंद देशमाने, श्री. अनिल इदे, श्री. सच्चिदानंद महाजन व श्री. संदीप वाडीले, 5) सर्व्हेअर-श्री. परशुराम बनपट्टे व श्री. घनश्याम गवळी.