Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘पुणे-पीसीएमसी मेट्रो’ नामविस्ताराची मागणी; आमदार शंकर जगताप यांनी सुचवले दोन‌ नवीन मेट्रो मार्ग

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड, पुणे व पीएमआरडीए हद्दीसाठी एकात्मिक दळणवळण विकास आराखडा (Comprehensive Mobility Plan – CMP) महामेट्रोमार्फत अंतिम टप्प्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे विशेष चर्चासत्र घेण्यात आले. या बैठकीत आमदार शंकर जगताप यांनी पिंपरी-चिंचवड शहराच्या भविष्यकालीन गरजांचा विचार करून आराखड्यात महत्त्वाच्या सुधारणा करण्याच्या सूचना केल्या. विशेषतः ‘पुणे मेट्रो’चा *‘पुणे-पीसीएमसी मेट्रो’*असा नामविस्तार करण्याची त्यांनी ठाम मागणी केली.

शहरात केवळ एकच मेट्रो मार्ग असतानाही पिंपरी-चिंचवड व पुणे शहरासाठी समान मुद्रांक शुल्क आकारले जात आहे, हे अन्यायकारक असून यावर त्वरित पुनर्विचार करावा, अशी मागणीही आमदार जगताप यांनी केली. पिंपरी-चिंचवडसाठी मेट्रोचे नवे मार्ग प्रस्तावित करताना त्यांनी भक्ती-शक्ती ते वाकड मार्गे चाकण आणि वाकड ते कात्रज हे दोन नवीन मेट्रो मार्ग सुचवले. वाढती लोकसंख्या व उद्योग वसाहती लक्षात घेता हे मार्ग भविष्यात अत्यंत उपयुक्त ठरतील, असे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा –  चिखली-कुदळवाडीतील आरक्षण ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू!

जलवाहतुकीचा पर्याय आणि इतर महत्त्वाच्या मागण्या

– पवना व इंद्रायणी नद्यांमध्ये जलवाहतुकीचा पर्याय तपासून घेऊन तो आराखड्यात अंतर्भूत करावा.
– मेट्रो स्थानकांबाहेर निशुल्क पार्किंगची व्यवस्था असावी. तेथील वाहनांवर कोणतीही दंडात्मक कारवाई करू नये.
– उद्योगनगरीतील मेट्रो पोल किंवा थांब्यांवर वारकरी संप्रदायाशी संबंधित चित्ररचना करण्यात याव्यात.
– हिंजवडी-वाकड भागासाठी स्वतंत्र एसटी स्थानकाची उभारणी व्हावी.
– स्मार्ट सिटीअंतर्गत उंचवलेले फुटपाथ रस्ते अरुंद करत असल्याने वाहन गॅरेज व वाहतूक प्रवाह यावर परिणाम न होईल अशा उपाययोजना कराव्यात.
– वाल्हेकरवाडी येथे रेल्वे ओव्हर ब्रिज व एमएम चौक काळेवाडी येथे ग्रेड सेपरेटर त्वरीत उभारण्यात यावा.म

चर्चासत्रात अनेक मान्यवरांची उपस्थिती

या चर्चासत्रात पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, माजी नगरसेवक संदीप वाघेरे, राजेंद्र गावडे, नामदेव ढाके, राजू दुर्गे, मारुती भापकर, सचिन चिखले, शर्मिला बाबर, शेखर चिंचवडे, धनंजय भिसे आदी उपस्थित होते.

महामेट्रोकडून तयार केला जात असलेला हा आराखडा भविष्यातील वाहतूक नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, आमदार शंकर जगताप यांच्या सूचनांमुळे पिंपरी-चिंचवडच्या गरजांनुसार त्यात सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button