ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘त्यागमूर्ती माता रमाईंचे स्मारक हे पिंपरी-चिंचवडकरांसाठी सामाजिक जाणिवेचा वारसा’; अभिषेक बारणे

पिंपरीत साकारणार त्यागमूर्ती माता रमाईंचे भव्य स्मारक; स्थायी समितीकडून स्थापत्य विषयक कामांना मंजुरी...

पिंपरी:- पिंपरी-चिंचवड शहराच्या वैभवात भर टाकणारा आणि सामाजिक कृतज्ञतेची साक्ष देणारा एक ऐतिहासिक निर्णय आज घेण्यात आला. शहराच्या मध्यवर्ती पिंपरी चौकात उभारण्यात येणाऱ्या माता रमाई स्मारकाच्या स्थापत्य कामांना महानगरपालिकेच्या स्थायी समितीने आज अधिकृत मंजुरी दिली. या निर्णयामुळे नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीला आता मूर्त स्वरूप मिळणार असून, लवकरच या स्मारकाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधूकर पवळे सभागृहात ही महत्त्वाची बैठक पार पडली. स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे आणि नगरसचिव मुकेश कोळप यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा –  सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच; चर्चा निष्फळ

माता रमाई या केवळ एका व्यक्तीचे नाव नसून, त्या असीम त्याग, संघर्ष आणि ममतेचे प्रतीक आहेत. वंचित घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी दिलेले योगदान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक क्रांतीत त्यांनी दिलेली साथ, हा इतिहास प्रेरणादायी आहे. हे स्मारक शहराच्या मध्यवर्ती भागात होत असल्याने ते येणाऱ्या पिढ्यांसाठी एक ऊर्जा केंद्र ठरेल.

स्थायी समितीच्या या मंजुरीमुळे आता स्मारकाच्या कामाला वेग मिळणार आहे. शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासोबतच सामाजिक वारसा जपण्याच्या दृष्टीने उचललेले हे पाऊल नागरिकांसाठी अभिमानास्पद ठरले आहे. पिंपरी-चिंचवड शहराने या निर्णयाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीची आपली परंपरा अधिक प्रगल्भ केल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“माता रमाईंचे स्मारक हे पिंपरी-चिंचवडकरांसाठी केवळ एक प्रकल्प नसून तो आपल्या सामाजिक जाणिवेचा वारसा आहे. त्यांच्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे स्मारक उभारण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. हे स्मारक केवळ स्थापत्यशास्त्राचा नमुना न राहता, समाजातील प्रत्येक घटकाला प्रेरणा देणारे ठरेल. या कामाचा दर्जा उत्तम राखत ते वेळेत पूर्ण करण्याला आमचे प्राधान्य असेल.”

-अभिषेक बारणे, स्थायी समिती सभापती, पिंपरी चिंचवड महापालिका.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button