Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

डॉ. सुशांत पाटील ग्रुप चॅम्पियन्स ट्रॉफी उत्साहात संपन्न

कर्मचारी एकोप्याचा उत्सव ठरलेल्या क्रिकेट स्पर्धेत DYPTC Legends व DYPTC Women Warriors संघांचे विजेतेपद

पिंपरी : डॉ. सुशांत पाटील ग्रुप चॅम्पियन्स ट्रॉफी ही स्पर्धा अत्यंत उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडली. ही स्पर्धा केवळ क्रिकेटपुरती मर्यादित न राहता, कर्मचारी वर्गामधील एकोप्याची भावना, संघभावना आणि सकारात्मक ऊर्जा यांचा उत्सव ठरली. विविध संस्थांतील कर्मचारी या स्पर्धेत सहभागी झाले होते आणि सर्वांनी उत्कृष्ट खेळाचे दर्शन घडवले.

पुरुष गटामध्ये DYPIMED Smashers, DYPTC Legends, Seam Super Strikers, DYPTC Titans, DYPCOE Gladiator, HO Elite, DYPTC Lion’s (H&C) आणि DYPCOEI Panther या संघांनी सहभाग घेतला. महिला गटामध्ये HO Thunderbirds, DYPIMED Smashers, DYPTC Women Warriors आणि DYPCOEI Women Tries या संघांनी दमदार खेळ सादर केला. संपूर्ण स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी क्रीडास्पर्धेची शिस्त आणि खिलाडूवृत्ती जपली.

चॅम्पियन्स श्रेणीमध्ये पुरुष गटात DYPTC Legends संघाने विजेतेपद पटकावले, तर DYPCOE Gladiator संघ उपविजेता ठरला. महिला गटात DYPTC Women Warriors संघाने विजेतेपद मिळवले आणि HO Thunderbirds संघाने उपविजेतेपद मिळवले

हेही वाचा पुणे लोणावळा प्रवाशांच्या समस्या कडे रेल्वेचे दुर्लक्ष रेल्वे अर्थसंकल्पाबाबत चिंचवड प्रवासी संघाचा निषेध

वैयक्तिक कामगिरीसाठीही अनेक खेळाडूंना गौरविण्यात आले. पुरुष गटात आकाश गायकवाड यांना मॅन ऑफ द मॅच तसेच सर्वोत्तम फलंदाज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महिला गटात आयशा सिंग हिने मॅन ऑफ द मॅच आणि सर्वोत्तम फलंदाज हे दोन्ही पुरस्कार मिळवले. पुरुष गटात दीपक खेलारे यांना मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार देण्यात आला, तर महिला गटात HO येथील सुचित्रा यांना हा सन्मान मिळाला. पुरुष गटात विठ्ठल राऊत यांना सर्वोत्तम गोलंदाज, तर महिला गटात प्रीती हिला सर्वोत्तम गोलंदाज पुरस्कार प्रदान करण्यात आला

ही संपूर्ण स्पर्धा यशस्वी होण्यासाठी डॉ. सुशांत पाटील सर आणि अ‍ॅड. अनुजा पाटील मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सततचा पाठिंबा लाभला. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे ही स्पर्धा संस्मरणीय आणि प्रेरणादायी ठरली.

डॉ. सुशांत पाटील ग्रुप चॅम्पियन्स ट्रॉफीने सर्व सहभागींसाठी आनंद, अभिमान आणि एकत्रितपणाची भावना निर्माण केली असून, या स्पर्धेच्या आठवणी दीर्घकाळ मनात राहतील.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button