Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पुणे लोणावळा प्रवाशांच्या समस्या कडे रेल्वेचे दुर्लक्ष रेल्वे अर्थसंकल्पाबाबत चिंचवड प्रवासी संघाचा निषेध

चिंचवड  :  रेल्वे अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्यातील प्रवासी यांच्या समस्या कडे दुर्लक्ष झाले आहे . पुणे लोणावळा दरम्यान सुरू असलेल्या उपनगरीय रेल्वे सेवेला आज 47 वर्ष पूर्ण झाली यात 17 रेल्वे स्थानके व 42 लोकलच्या दिवसभरात ये -जा सुरू आहे . अंदाजे दररोज सव्वा लाख प्रवासीयांची चढ उतार पुणे लोणावळा दरम्यान होते . 64 किलोमीटर लांबीच्या असलेल्या या रेल्वे मार्गावर लोकलसाठी दोन स्वतंत्र रेल्वे मार्गीका झाली तरच लोकल वाढ करता येईल , असे रेल्वे प्रशासनाने वारंवार सांगितले. सध्या 150 हुन अधिक लांब पडल्याच्या गाड्या येथीत अनेक स्थानकादरम्यान दुहेरी रेल्वे मार्गावरून गाड्यांची ये – जा सुरू असते. या मार्गावरील लांब पाल्याच्या प्रवासी व मालगाड्यांच्या ताण लक्षात घेता चिंचवड प्रवासी संघ १९९० सालापासून पुणे लोणावळा दरम्यान रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण रेल्वे मार्ग पूर्ण व्हावी. अशी मागणी करीत आहे.

आज – तागायत रेल्वेमंत्री पासून आजपर्यतच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री , पुणे , मुंबई रेल्वे अधिकाऱ्यांना लेखी निवेदने दिले . प्रत्यक्ष भेटी घेतले , आंदोलने केली परंतु प्रश्न सुटला नाही. प्रश्न सुटावा यासाठी प्रवासी संघ कायमस्वरूपी दक्ष असून नुकतेच शेवटी राज्य शासनाने 11 सप्टेंबर 2025 साली महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रश्नाला मान्यता दिली. त्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वेळोवेळी चिंचवड प्रवासी संघाने पाठपुरावा केला त्याची भेट घेवून त्याचे आभार देखील मानले होते त्यात पूर्ण प्रकल्पासाठी 5100 कोटीची मान्यता देण्यात आली. सन 2025 ते 2029 दरम्यान पुणे लोणावळा रेल्वे मार्गिका प्रकल्पाचा अंदाजित खर्चाचा तपशील देण्यात आला .तिसरी व चौथी उपनगरीय रेल्वे मार्गिका प्रकल्पामधील गुंतवणुकीचे वेळापत्रकही देण्यात आले. त्यात केंद्रशासन राज्य शासन, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे महापालिका , पिंपरी चिंचवड महापालिका यांच्या सहभाग आहे . पुणे जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्यामुळे लोकलच्या फेऱ्या अधिक वाढणे ही काळाची गरज आहे कष्टकरी, कामगार, महिला, विद्यार्थ्यांना परवडणारी लोकल सेवा असल्यामुळे लोकल वाढीसाठी प्रकल्पाला गती दिली गेली पाहिजे. तसेच माजी रेल्वे राज्यमंत्री सुरेश कलमाडी यांनी 1996 घोषणा केली कि , चिंचवड रोहा रेल्वे नवीन रेल्वे मार्ग व्हावा . पुणे तळेगाव चाकण मार्गे नासीक पर्यंत नवीन रेल्वे मार्गव्हावा . ही मागणी खडकी , दापोडी , कासारवाडी , पिंपरी , चिंचवड या परीसरात नासीक व चाकण औद्योगिक क्षेत्रात येजा करणारा वर्ग मोठया प्रमाणात स्थायीक आहे . त्याना फायदा होईल रेल्वे लोकल सेवा पुणे चाकण सुरू करता येईल .

हेही वाचा – झोनल कुस्ती स्पर्धेत झिल तंत्रनिकेतनचे दमदार यश

नागरी वस्तीला फायदा होईल . सन 2020 पासून कोरोना काळात बंद केलेल्या मुंबई कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस, पुणे कल्याण मार्गे नाशिक भुसावळ एक्सप्रेस, बारामती ते कर्जत पॅसेंजर शटल, मुंबई पुणे मार्गे सोलापूर एक्सप्रेस या गाड्या त्वरित सुरू करण्यात याव्यात. अशी चिंचवड प्रवासी संघाची मागणी आहे. आकुर्डी देहूरोड दरम्यान साडेपाच किलोमीटरचे अंतर असून आकुर्डी च्या पुढे दोन किलोमीटर अंतरावर रावेत हे नवीन रेल्वे स्थानक निर्माण व्हावे आज रावेत परिसरात सुमारे दीड लाखाहून अधिक लोकसंख्या असून त्यांना पुणे पिंपरी शहरात ये जा करणे त्यांच्यासाठी लोकल नवीन स्थानक झाले तर पुणे लोणावळा तसेच मुंबईकडे व परराज्यात जाण्यासाठीही त्यांची मोठी सोय होईल यासाठी अनेक वर्षा चिंचवड प्रवासी संघ याचा पाठपुरावा करत असून रेल्वे मंत्री तसेच अधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही तर चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात शहरवासीयांच्या सह्यांची मोहीम तसेच सोसायटीचे पत्रे घेऊन उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहोत. चिंचवड रेल्वे स्थानकावर कोकण, हैदराबाद, सोलापूर, बेंगलोर, मद्रास मार्गावर सध्या ज्या एक्सप्रेस गाड्या ये – जा करतात त्यापैकी महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मिळाला पाहिजे. आज पुणे रेल्वे स्थानकावर मोठा ताण येत असून प्रवाशांना उभे राहण्यासाठी देखील जागा गर्दीच्या वेळी उपलब्ध होत नाही

.चिंचवडला थांबा दिला तर पुणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांचा ताण कमी होईल. येथील प्रवाशांचा वेळ, पैसा, शारीरिक श्रमही वाचेल . सध्या दुपारी 11 ते 3 दरम्यान लोकल सेवाच उपलब्ध नाही .पुणे लोणावळा मार्गावरती त्यामुळे प्रवासी ,महिला ,विद्यार्थी ,कामगार यांचे अतोनात हाल होत असून त्यांना अनेक समस्यांना सामोरे जाण्याची वेळ येत आहे .पुणे लोणावळ्या दरम्यान मुंबई प्रमाणे 15 डब्याची लोकल सुरू झाली तर गर्दीचा ताण काहीसा कमी होईल. तसेच पुणे रेल्वे स्थानकावरून लोकल गाड्या न सोडता हडपसर येथून पुणे लोणावळा मार्गाकडे लोकल सुरू व्हावी अशी मागणी चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलाम अली भालदार ,नारायण भोसले, अँड मीना अग्रवाल ,मुकेश चुडासमा, निर्मला माने, संभाजी बारणे , रजिना फॉान्सिस , वैशाली मिडगुले , मंगल चौधरी , बाळाबाई माने आदींनी ई-मेल द्वारे संबंधित मान्यवरांना केल्या आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button