ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

तळेगाव नगरपरिषदेमध्ये फेरीवाला समितीची बिनविरोध निवड

बाबा कांबळे यांच्या उपस्थितीमध्ये मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी दिलेली नियुक्तीपत्र

पिंपरी : तळेगाव नगरपरिषदेमध्ये फेरीवाला समितीच्‍या आठ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. या सदस्‍यांना मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी नियुक्‍तीपत्र दिले. टपरी, पथारी, हातगाडी पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांच्‍या उपस्‍थितीत हे नियुक्‍तीपत्र देण्यात आले. तळेगाव नगर परिषदेमध्ये मंगळवारी (ता. १) दुपारी 12 वाजता हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी टपरी, पथारी, हातगाडी पंचायतचे तळेगाव शहर अध्यक्ष किरण साळवे आदी या वेळी उपस्थित होते. मुख्य अधिकारी विजयकुमार सरनाईक, उप मुख्य अधिकारी ममता राठोड, संबंधितविभागाच्या विभा वाणी, निवडणूक अधिकारी, कल्याणी लाडेकर, कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. हि प्रक्रिया राबवण्यासाठी विभा वाणी यांनी प्रक्रिया पूर्ण केली.

महापालिका, नगरपालिका हद्दीमधील फेरीवाल्यांच्‍या प्रतिनिधींची फेरीवाला समिती स्थापन केली जात आहे. यामध्ये फेरीवाल्यांचे प्रतिनिधी निवडले जात आहेत. त्‍याअंतर्गत तळेगाव नगरपरिषदेमध्ये देखील निवडणूक प्रक्रिया पार पडली.

या वेळी बाबा कांबळे म्‍हणाले की, स्‍थानिक स्वराज्‍य संस्‍थांतर्गत येणाऱ्या टपरी, पथारी, हातगाडीधारकांना हॉकर्स झोन निश्‍चित करून त्‍यांचे व्‍यवसाय करून देण्याला परवानगी द्यावी लागणार आहे. त्‍यासाठी शासनस्‍तरावर विविध योजना राबविल्‍या जातात. मात्र त्‍या कागदावरच राहत आहेत. प्रत्‍यक्षात त्‍याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्‍यासाठी फेरीवाला समितीमधील सदस्‍यांनी पाठपुरावा करणे आवश्‍यक आहे. सदस्य ते काम करतील, अशी अपेक्षा असल्‍याचे बाबा कांबळे म्‍हणाले.

निवड झालेले सदस्य 

दत्तात्रय पंडित भोसले, किरण बबन जव्हेरी (सर्वसाधारण पुरुष गटातून निवड झाली.) तसेच सुजाता रवींद्र बैचे (सर्वसाधारण महिला), करुणा प्रकाश सरोदे (अनुसूचित जाती-महिला), रामदास बबन आगिवले (अनुसूचित जमाती), निलेश बाळकृष्ण मांजरेकर (इतर मागास वर्ग), जायादाबी हुसेन शेख (अल्पसंख्याक महिला), पृथ्वीराज विष्णू चव्हाण (दिव्यांग) आदी आठ जणांची बिनविरोध निवड झाली.

अधिक माहितीसाठी संपर्क

बाबा कांबळे, अध्यक्ष, टपरी, पथारी, हातगाडी पंचायत.
– मो. नं : 98507 32424

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button