‘सातत्य, जिद्द,चिकाटी, कठोर परिश्रमामुळे अपेक्षित यश’; व्याख्याते सिद्धार्थ शहा
शिक्षण विश्व : प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

पिंपरी-चिंचवड : चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट मध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी थिंक अँड ग्रो रीच अकॅडमी इंडियाचे संस्थापक आणि सीईओ, आंतरराष्ट्रीय व्याख्याते सिद्धार्थ शहा यांचे आपली मानसिकता, यश आणि जीवनावर प्रभुत्व या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन व्याख्याते सिद्धार्थ शहा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावरती हेतल शहा , कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ दीपक शहा , मॅनेजमेंटचे संचालक डॉ. सचिन बोरगावे, विभाग प्रमुख प्रा . गुरुराज डांगरे , कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक प्रा. मनीष पाटणकर, विशेष आमंत्रित रवी वर्मा ,विद्यार्थी प्रतिनिधी सिद्धार्थ क्षीरसागर , कृपालिनी सुतार , प्राध्यापका समवेत सुमारे 300 विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी डॉ. दीपक शहा यांच्या हस्ते सिद्धार्थ शहा, हेतल शहा यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्याख्याते सिद्धार्थ शहा पुढे म्हणाले, तुम्ही जे शिक्षण घेत आहात ते मनापासून शिकण्याची तयारी ठेवा. पुस्तकाबरोबर मैत्री करा. कामाव्यतिरित्क मोबाईल पासून इतर वेळी दूर राहा. नियमित अभ्यास करा. आळस झटकून टाका . नंतर करू ही मनाची मानसिकता बदलून टाका. गेलेली वेळ परत येत नाही. आपले भावी भवितव्य आपल्यालाच घडवायचे आहे हे लक्षात घेऊन, वेळीच योग्य निर्णय घ्या.अंगी शिस्तीचे अनुकरण करा .स्वयंशिस्त नसणे हे दुर्दैव असते, माझं काहीच होणार नाही ही नकारात्मक जीवनशैली झटकून टाका. समस्या आव्हाने आले तरी त्यातूनच यशस्वीतेचा मार्गही असतो ,यश मिळेल का या मानसिकतेमध्ये अडकून राहू नका. सतत चिकित्सक रहा. दैनदिन जीवनात स्वतःची मानसिकता उत्तम ठेवा. प्रसंगी खच खाऊ नका. अभ्यासक्रमाला पूरक पुस्तके खरेदी करून त्याचे वाचन करा . आपल्या भोवताली श्रीमंत अतिश्रीमंत होतात, गरीब गरिबीच्या खाली जातो असे का होते ,याचा स्वतःच विचार करा. लक्षात ठेवा जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रमाशिवाय अपेक्षित यश साध्य करता येत नाही. यश मिळवणे हे सतत चालणारा प्रवास असून, झालेली चूक परत होणार नाही याची काळजी घ्या. यश मिळविण्यासाठी व आपल्या जीवनावर प्रभुत्व मिळवण्यासाठी संधी मिळत नसते, ती मिळवावी लागते . काय भविष्यात व्हायचे यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करा , इतर करू शकतात तर मग मी का नाही करू शकत , याचे स्वतः परीक्षण करा. असे आवाहन केले. यावेळी अनेकांच्या शंकेचे , प्रश्नाचे निरसन करण्यात आले.
हेही वाचा – प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात राज्यस्तरीय उत्कृष्ट पाठ सादरीकरण स्पर्धा
कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा आपल्या अध्यक्षीय मनोगतात म्हणाले की, संस्थेने विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध केल्या आहे . उत्तम प्राध्यापक वर्ग आहे. विद्यार्थानी स्वतःमध्ये बदल कोठून कसा करावयाचा याचा विचार प्रत्येकाने व सतत केला पाहीजे . भावी आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर , तुमच्या मनामध्ये दृढ इच्छा असली तरी मनात चालढकल असेल तर,भावी आयुष्यात काहीच करू शकणार नाही. अपेक्षीत यशापासून दूर राहाल. लक्षात ठेवा ब्रह्मदेवाने सर्वांना सारखीच बुद्धी वाटलेली आहे.
आपल्या बुद्धीच्या योग्य वापर करा. शून्यातून यशस्वी होता येते, याचे अनेक उदाहरणे देत , आयुष्यात मलाही काहीतरी व्हायचच आहे, याची खून गाठ प्रत्येकानी मनाशी बाधा . ज्याच्या मनात ज्वाला अग्नी पेटलेला असतो , तीच माणसे भविष्यात यशस्वीतेच्या शिखरावर जातात .असे सांगून डॉ. शहा पुढे म्हणाले , संस्था तुमच्या उज्वल भवितव्यासाठीच विविध उपक्रमाचे आयोजन करते , त्यापासून स्फुरण घ्यावे ,असे आवाहन देखील केले.
यावेळी संचालक डॉ. सचिन बोरगावे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ क्षीरसागर यांनी केले तर आभार मुख्य समन्वयक प्रा. मनीष पाटणकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.