Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

वीर जवानांच्या शौर्याला विद्यार्थ्यांची मानवंदना!

शिक्षण विश्व: मोरया शिक्षण संस्थेच्या व्ही.के. माटे हायस्कूलमध्ये कारगिल विजय दिन साजरा

पिंपरी चिंचवड :  मोरया शिक्षण संस्थेच्या व्ही.के. माटे हायस्कूलमध्ये कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी वीर जवानांच्या शौर्याच्या आठवणींना उजाळा देत हुतात्म्यांना मानवंदना दिली.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रत्यक्ष कारगिल युद्धामध्ये सहभाग घेतलेले व कारगिल टेकडीवर सर्वात प्रथम भारताचा तिरंगा फडकवणारे वीर श्रीमान जिगेंद्र कुमार पारस वाला आणि त्यांची मुलगी स्मिता माळी मॅडम हे होते. तसेच माजी सैनिक भारतीय सेना श्रीमान अरुण सिंग, मार्शल कॅडेट फोर्स चे संचालक जाधव साहेब, एम. सी .एफ .चे ट्रेनर सचिन सर आणि इस्रा मुल्ला इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच या युद्धामध्ये बलिदान दिलेल्या सर्व सैनिकांना मानवंदना देण्यात आली.देशभक्ती ,शौर्य, बलिदान या मूल्यांची जाणीव करून देण्यासाठी शाळेमध्ये कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला.

हेही वाचा –  आनंदवार्ता..! आजपासून मुंबई-पुणे-सोलापूर ‘वंदे भारत’ २० डब्यांची, या प्रवाशांना अधिक दिलासा

प्रमुख पाहुणे जिगेंद्रसिंग पारस वाला यांनी आपल्या मनोगतात हा दिवस फक्त विजय दिवस म्हणून साजरा करण्यासाठी नसून शहीद जवानांची आठवण ठेवण्याचा आणि त्यांचा आदर करण्याचा दिवस आहे ,असे सांगून कारगिल युद्धाची पार्श्वभूमी सांगितली मे 1999 ते जुलै 1999 या दरम्यान भारतातील कारगिल ,ब्रास ,बटालिक या भारताच्या पर्वतमय भागात पाकिस्तानी सैनिकांनी आणि घुसकरांनी एलओसी चे उल्लंघन करून भारताच्या नियंत्रण असणाऱ्या उंच पर्वतीय भागांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा भारतीय लष्कराने ऑपरेशन विजय ही मोहीम चालून वरील सर्व ठिकाणांवरून घुसखोरांना पिटाळून लावले. 26 जुलै 1999 ला भारताने पूर्ण नियंत्रण मिळवले .त्यामुळे 26 जुलै हा दिवस कारगिल विजय दिन म्हणून पवित्र मानला जातो. भारताने पाकिस्तान विरुद्ध निर्णायक विजय होता ,त्यामुळे या दिवसाचे महत्त्व जास्त आहे.असे सांगितले.

प्रमुख पाहुणे श्रीमान जिगेन्द्र कुमार पारस वाला यांनी या युद्धा तील प्रसंगाचे वर्णन केले. व याच युद्ध कर्तव्य बजावत असताना त्यांना तीन गोळ्या लागण्याचे सांगितले. तसेच दुसरे प्रमुख पाहुणे अरुण सिंग यांनीही आपले अनुभव सांगून सांगून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती शौर्य हे मूल्य जागृत केले.

कार्यक्रमाला शाळेचे उपमुख्याध्यापक दिलीप कुमावत पर्यवेक्षिका मैत्रेयी राजे, शिक्षक समन्वयक संजय खेडकर तसेच विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत हुचगोळ यांनी केले तर मान्यवर आणि उपस्थित यांचे आभार सौ अनिता बोरसे यांनी मानले. कार्यक्रमासाठी देव सर यांनी नियोजन केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button