पुनावळे येथील साईराज हाइट्समध्ये सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित!
55 KW क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प : 115 फ्लॅट धारकांना वीज बिलांमध्ये दिलासा मिळणार!

पिंपरी | पुनावळे येथील साईराज हाइट्स सोसायटीने पुनावळे येथे 55 KW क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला. या महत्वाकांक्षी उपक्रमामुळे ११५ फ्लॅट्ससाठी अत्याधुनिक पद्धतीने सौर पॅनेल्सच्या माध्यमातून वीसपुरवठा केला जाणार आहे. हा सुसज्ज प्रकल्प परिसरासाठीआदर्श ठरत आहे.
पुनावळे येथील साईराज हाईटस येथील सौर ऊर्जा प्रकल्पाचे मा. आमदार अश्विनी जगताप यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजपा उपाध्यक्ष नवनाथ ढवळे प्रमुख उपस्थिती होते. वीज दरवाढ आणि पर्यावरणीय चिंता यावर एक विश्वासार्ह आणि कार्यक्षम उपाय म्हणजे सौर ऊर्जा प्रकल्प. सध्या सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी अनेक सोसायटींकडून सकारात्मक प्रतिसाद येत आहे. ऊर्जा कार्यक्षमतेच्या दिशेने साईराज हाइट्स समितीच्या सदस्यांनी देखील सकारात्मक पाऊल टाकले.
हेही वाचा – भारत विरुद्ध इंग्लंड टी-२० मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर!
अध्यक्ष भूपेश आतकरी आणि सचिव नितिन कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील अथक प्रयत्नांमुळे आणि सर्व सदस्यांच्या योगदानामुळे कॅपेक्स मॉडेलच्या आधारावर सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प सोसायटीने कार्यान्वित केला आहे. ११५ फ्लॅट्ससाठी अत्याधुनिक सौर पॅनेल्सने सुसज्ज असलेला हा प्रकल्प एक आदर्श ठरला आहे.
याबाबत सोसायटीचे अध्यक्ष आतकरी म्हणाले, या सौरऊर्जा प्रणालीद्वारे दरमहा ६५०० KW ऊर्जा उत्पादन होईल. यामुळे आमच्या वीजेच्या खर्चात दरमहा सुमारे दीड लाखांची बचत होईल, ज्यामुळे आमच्या एकूण वीज खर्चाचा ८०% हिस्सा कमी होईल. यासोबतच, या उपक्रमामुळे दरमहा सुमारे १५० झाडांची कत्तल थांबणार आहे.ज्यामुळे आपला कार्बन फूटप्रिंट कमी होईल.
हा प्रकल्प कार्यान्वित करताना उद्घाटनाच्या प्रसंगी माजी आमदार आश्विनी जगताप, तसेच नवनाथ ढवळे, विंडसन सोलारचे अध्यक्ष जयेश अकोले, सोसायटीचे कोषाध्यक्ष कुंदन बिजोरे, समीर तामणे, माधुर चिचानी, सरिता सोनावणे, प्रतीन, अंबुज गुप्ता, आणि निखिल कुलकर्णी आदी उपस्थित होते.
जगभरात नूतनीकरणीय ऊर्जा वापरण्याचा प्रवास वाढत असताना, सौर ऊर्जा ही सिद्ध झाली आहे. हा प्रकल्प केवळ दीर्घकालीन वीज बिलांमध्ये बचत करण्यास मदत करत नाही, तर स्वच्छ आणि टिकाऊ भविष्याच्या दिशेने आमच्या प्रतिबद्धतेला देखील बळकट करतो.
या प्रकल्पाच्या यशामागे एकत्रित प्रयत्न आहेत.– भूपेश आतकरी, अध्यक्ष, साईराज हाइट्स सोसायटी.