Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

भारत विरुद्ध इंग्लंड टी-२० मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर!

IND vs ENG | भारतीय संघ नव्या वर्षात घरच्या मैदानावर इंग्लंडविरूद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलिया दौरा संपल्यानंतर टीम इंडिया नवीन वर्षात घरच्या मैदानावर पहिली मालिका खेळणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियासाठी ही महत्त्वाची मालिका असणार असल्याचे सांगतले जाते. या टी-२० मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. ज्यामध्ये मोहम्मद शमीने पुनरागमन केले आहे. तर टी-२० मालिकेनंतर भारताला इंग्लंडविरूद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे.

भारत वि. इंग्लंड टी-२० मालिकेचे पूर्ण वेळापत्रक

  • पहिला टी-२० : २२ जानेवारी २०२५, कोलकाता (ईडन गार्डन्स)
  • दुसरी टी-२० : २५ जानेवारी २०२५, चेन्नई (एमए चिदंबरम स्टेडियम)
  • तिसरा टी-२० : २८ जानेवारी २०२५, राजकोट (सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम)
  • चौथा टी-२० : ३१  जानेवारी २०२५, पुणे (महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम)
  • पाचवा टी-२० : ०२  फेब्रुवारी २०२५, मुंबई (वानखेडे स्टेडियम)

हेही वाचा    –      ..तर मोहन भागवतांना अटक झाली असती; राहुल गांधींचं वक्तव्य 

टी-२० मालिकेसाठी दोन्ही संघ

इंग्लंडचा संघ

हॅरी ब्रूक, बेन डकेट, जॅकब बेथेल, लियाम लिव्हिंगस्टोन, रेहान अहमद, जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, जोस बटलर, जेमी स्मिथ, फिलिप सॉल्ट, गस ऍटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड, साकिब महमूद.

भारतीय संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, वरूण चक्रवर्ती, रवि बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button