ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

धुराचे लोळ, पळापळ अन् प्रचंड भीती!

पिंपरी महापालिका इमारतीमध्ये मॉकड्रिल यशस्वी

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशाकीय इमारतीमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण… धुरांचे लोळ…आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाचे फोन खणाणले… लगेच सायरनचा आवाज पसरला आणि एकच धावाधाव झाली. सुरक्षा यंत्रणेने तत्काळ चक्रे फिरवली…आणि अग्निशमन विभागाचे पथक पाच मिनिटांत पोहोचले…कर्मचारी, नागरिकांना सुरक्षितरित्या इमारतीबाहेर काढण्यात आले. १५ मिनिटात स्वसंरक्षण सराव (मॉकड्रिल) यशस्वी पार पडले.

युद्धजन्य परिस्थितीमध्ये शहरातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षम ठेवणे, नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्य इमारतीमध्ये बुधवारी मॉकड्रिल घेण्यात आले. चार वाजता सायरन वाजला. महापालिका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर धूर पसरला असून काही लोक जखमी झाले आहेत. काहीजण अडकले असल्याची माहिती देण्यात आली. त्यानुसार पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीमधून सर्वांना बाहेर काढले. सर्वजण बाहेर आल्यानंतर जवानांनी प्रत्येक दालनात जाऊन कोणी अडकले नसल्याची खात्री केली. त्यानंतर इमारतीमधून चार नागरिकांना ‘ब्रांटो स्काय लिफ्ट’च्या मदतीने रेस्क्यू करण्यात आले. दोघांना रोप लावून रेस्क्यू केले. तर, चौघांना स्ट्रेचरवरून रेस्क्यू करत रुग्णवाहिकेतून रुग्णालयाच्या दिशेने रवाना केले.

हेही वाचा   :    Operation Sindoor । ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये जल्लोष!

या मॉकड्रिलमध्ये अग्निशमन विभागाच्या चार बंबासह २० अधिकारी, कर्मचारी, चार रुग्णवाहिका, १६ कर्मचारी, सुरक्षा विभागाचे ५२ कर्मचारी , पोलीस अधिकारी, कर्मचारी असे ३७ जण तसेच वाहतूक पोलीसांचे २४ जण, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे एक अधिकारी, एनसीसी व राष्ट्रीय सेवा योजनेचे ४६ स्वयंसेवक, १८ आपदा मित्र सहभागी झाले होते.

‘स्मोक एग्जॉस्ट यंत्रणा’ही सज्ज

काही महिन्यांपूर्वी महापालिका इमारतीमध्ये मॉकड्रिल करण्यात आले होते. त्यावेळी इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. तो धूर लवकर बाहेर पडला नव्हता. अशाच प्रकारे रासायनिक हल्ला झाल्यास त्या धुरामध्ये अडकून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता लक्षात घेत धूर तात्काळ बाहेर काढण्यासाठी ‘स्मोक एग्जॉस्ट यंत्रणा’ बसवण्यात आली आहे. ही यंत्रणा सक्रिय करून सर्व धूर काही क्षणात बाहेर काढण्यात आला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

आपत्ती अचानक येते. त्यामुळे मॉकड्रिलच्या माध्यमातून यंत्रणांचे प्रशिक्षण आणि सज्जता वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. भविष्यात अशा अधिकाधिक मॉकड्रिल उपक्रमांचे आयोजन केले जाईल. १५ मिनिटांत मॉकड्रिल यशस्वीपणे पार पडले.

तृप्ती सांडभोर,
अतिरिक्त आयुक्त,
पिंपरी-चिंचवड महापालिका

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button