ताज्या घडामोडीपुणे

जुन्नरमध्ये हृदयद्रावक घटना; शेततळ्यात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू

पुणे | पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बल्लाळवाडी येथे हृदयद्रावक दुर्घटना घडली असून शेततळ्यात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बल्लाळवाडी येथील गाडेकर यांच्या शेतातील शेततळ्याजवळ ही मुले खेळत होती. खेळता खेळता त्यांचा तोल जाऊन ती शेततळ्यात पडली. बराच वेळ घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

हेही वाचा

निगडीतील हाय टेन्शन टॉवरवर चढलेल्या इसमाचा थरारक बचाव!

या घटनेत मृत झालेल्या मुलांची आडनावे पवार आणि नवले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिस आणि स्थानिक रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. बचाव पथकाने शर्थीचे प्रयत्न करून दोन्ही मुलांचे मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढले.

या दुर्घटनेमुळे बल्लाळवाडी आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, या घटनेनंतर शेततळ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ग्रामीण भागात शेतीसाठी उपयुक्त असलेली शेततळी योग्य संरक्षक उपायांशिवाय धोकादायक ठरत असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button