ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

‘ती’ने आत्मविश्वासाने जीवनाचे संतुलन साधावे – पद्माताई भोसले

पीसीसीओइ मध्ये 'महिला दिन' साजरा

पिंपरी | ‘ती’ ने फक्त घरातील जबाबदाऱ्यांपुरतं मर्यादित न राहता स्वतःच्या करिअर आणि वैयक्तिक आकांक्षा शोधून पुढे यावे. ‘ती’ ने आत्मविश्वास आणि दृढ निश्चयाने व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवन दोन्हीचे संतुलन साधावे. तसेच इतरांचे अनुकरण करण्यापेक्षा ‘स्व’ ची ओळख स्वीकारली तर जीवनात आनंद मिळेल. सर्व क्षेत्रात आता महिला महत्त्वाच्या भूमिका बजावत आहेत. आंतरराष्ट्रीय महिला दिन हा महिला सक्षमीकरणाचा उत्सव आणि विविध क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीची ओळख आहे असे पीसीइटीच्या उपाध्यक्षा पद्माताई भोसले यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओइ) येथे महाविद्यालय अंतर्गत तक्रार समिती यांच्या सहकार्याने महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पद्माताई भोसले बोलत होत्या.

यावेळी मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम प्रमुख डॉ. एस. शिंदे, शैक्षणिक प्रमुख डॉ. के. राजेश्वरी, इनोव्हेशन इंक्युबेशन प्रमुख डॉ. रजनी पीके, फॅकल्टी डेव्हलपमेंट अँड वेल्फेअर डॉ. एस. भंडारी, इंटरनॅशनल रिलेशन्स प्रमुख डॉ. रोशनी राऊत, क्वालिटी ऍशुरन्स डॉ. व्ही. हरपाळे, उपयोजित विज्ञान प्रमुख डॉ. लीना शर्मा, संगणक अभियांत्रिकी प्रमुख डॉ. सोनाली पाटील, माहिती तंत्रज्ञान विभाग डॉ. जयश्री कट्टी, सीएसइ प्रमुख डॉ. अनुराधा ठाकरे, संगणक अभियांत्रिकी प्रमुख डॉ. रचना पाटील, बहुविद्याशाखीय अभ्यास विभाग प्रमुख डॉ. संजीवनी सोनार, कॉम्प्युटर एप्लीकेशन प्रमुख डॉ. अश्विनी लाडेकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा      :            उद्योगांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी उभारी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

शिक्षणामुळे महिलांना स्वतःची खरी ओळख आणि क्षमता समजून घेण्याची संधी मिळते. तसेच आत्मविश्वास निर्माण होऊन स्वतंत्र निर्णय घेण्याची प्रेरणा मिळते आणि भविष्यासाठी योग्य, अयोग्य निवड करण्याचे धैर्य प्राप्त होते असेही पद्माताई भोसले म्हणाल्या.

पीसीसीओइ ने हे शैक्षणिक वर्ष “एआय वर्ष” म्हणून घोषित केले आहे. यावेळी महिला सक्षमीकरणासाठी एआय या विषयावर आधारित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थिनींनी महिलांच्या सुरक्षितता, आरोग्य, शिक्षण, आर्थिक साक्षरता, करियर संबंधित समस्या यावर एआय आधारित उपाय सादर केले होते. पीसीसीओइच्या विद्यार्थ्यांनी ऑस्ट्रेलियातील लाट्रोब विद्यापीठाच्या सहकार्याने विकसित केलेल्या “निर्भया” प्रकल्प सादर केला होता. तसेच प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले.

प्रास्ताविक आयसीसी प्रभारी डॉ. वृषाली भालेराव यांनी तर सूत्रसंचालन श्रावणी भांडलकर आणि प्राजक्ता चव्हाण या विद्यार्थिनींनी केले. प्रा. डॉ. सोनल गोरे यांनी आभार मानले.

पीसीइटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आणि पीसीसीओइचे संचालक, प्राचार्य डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button