‘आरोपी हे विशिष्ट पक्षाचे…’, रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची काही गुंडांनी छेड काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात 26 वर्षीय तरुणीवर दिवसाढवळ्या बलात्काराची घटना ताजी असतानाच आता केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरोपी हे एका विशिष्ट पक्षाचे असून, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि त्यांची मुलगी जळगावामधील मुक्ताताईनगरमध्ये यात्रेसाठी आल्या होत्या. या यात्रेमध्ये काही टवाळखोर मुलांकडून खडसे यांच्या मुलीसह काही तरुणींची छेड काढण्यात आली. या प्रकरणात पोलिसात तक्रार दाखल केली असून, यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गेगी वाचा – “नेता होण्यासाठी दुसऱ्या समाजांना शिव्या देण्याची…”, जयंत पाटलांचा पडळकरांना टोला?
‘एकनाथ खडसे यांच्या नातीवर छेडछाड करणारे आरोपी हे एका विशिष्ट पक्षाचे आहेत. पोलिसांनी काही आरोपींना अटक केली आहे, इतरांचा शोध सुरू आहे. आरोपींना माफी देता कामा नये, त्यांच्यावर कडक कारवाई होईल’, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे.
या प्रकरणातील आरोपींचा पोलिस शोधत येत आहे. 6 जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपींपैकी एका अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते आणि रक्षा खडसे यांचे सासरे एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गुंडांना स्थानिक लोकप्रतिनिधींचे संरक्षण असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.