ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

PCMC | झिंजूर्डे मळा परिसरात रस्ता काँक्रिटीकरणाला ‘‘गती’’

भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांचा पाठपुरावा

पिंपरी-चिंचवड | पिंपळे सौदागरच्या झिंजूर्डे मळा परिसरात सुरू असलेल्या १८ मीटर रुंदीच्या रस्ता काँक्रिटीकरण कामाची पाहणी भाजपाचे शहराध्यक्ष आणि नगरसेवक शत्रुघ्न (बापु) काटे यांनी नुकतीच केली. यावेळी नगरसेविका कुंदाताई भिसे आणि नगरसेविका अनिताताई काटे यांच्यासह कामाच्या प्रगतीची सखोल पाहणी करण्यात आली.

पाहणीदरम्यान कामाची सद्यस्थिती, गुणवत्ता, ड्रेनेजची व्यवस्थिती आणि वाहतुकीस होणाऱ्या तणाव कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. तसेच, काम नियोजित वेळेत गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन देण्यात आले.

हेही वाचा    :            पुणे मेट्रोच्या तीन स्थानकांची नवी प्रवेशद्वारे आजपासून खुली 

या पाहणीदरम्यान जयनाथशेठ काटे, संदिपशेठ काटे, स्थापत्य उपअभियंता जोशी साहेब, कनिष्ठ अभियंता टकले मॅडम आणि कॉन्ट्रॅक्टर्स उपस्थित होते. काम पूर्ण झाल्यानंतर झिंजूर्डे मळा परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत होऊन नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात मोठी सोय होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी दिलेल्या आश्वासनामुळे स्थानिक नागरिकांमध्ये काम लवकर पूर्ण होईल आणि परिसरातील वाहतूक सुविधा सुधारेल, याबाबत सकारात्मक अपेक्षा निर्माण झाली आहेत.

झिंजूर्डे मळा परिसरातील १८ मीटर रस्ता काँक्रिटीकरण काम हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आम्ही विशेष दक्षता घेत आहोत की काम पूर्णत्वाला पोहचताना नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा, रस्ता दर्जेदार बनेल आणि वाहतूक सुरळीत होईल. तसेच परिसरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही सातत्याने देखभाल आणि पाठपुरावा करीत राहणार आहोत. नागरिकांची सुविधा आणि सुरक्षितता हेच आमचे मुख्य ध्येय आहे.

– शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button