‘चारित्र्यहीन व्यक्ती ही राजकारणातील व्हिलन..’; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना खोचक टोला

चांगले रस्ते फोडले आणि म्हणे विकास केला
बीड : बीडच्या परळी कौठळी गावात जल जीवन मिशन योजनेचा शुभारंभ सोहळा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हस्ते पार पडला. पंकजा मुंडे यांचे कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलं. यावेळी बोलताना पंकजा मुंडेंनी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे.
मुंडे साहेबांच्या नंतर तुम्ही सगळे कोणाचं नाव घेता माझं, कारण तुम्हाला कुशल अन् चांगला नेता तुम्हाला पाहिजे. मी निवडणुकीमध्ये हरले तेव्हापासून तुमच्या मोबाईलवरचे मेसेज येणं बंद झाले. पैसे वाटणारा, तामाशा दाखवणारा, मत विकत घेणारा भ्रष्टाचार करणारा, खोटे गुन्हे दाखल करणारा, चारित्र्यहीन व्यक्ती ही राजकारणातील व्हिलन असते, असा टोला पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना लगावला आहे.
घराघरात पाणी पाणी देणारा नेते पाहिजेत की घरा घरात चपटीची बॉटल देणारा नेता पाहिजे. परळी शहरात भुयारी गटारयोजनेच्या नावाखाली चांगले रस्ते फोडले आणि म्हणे विकास केला. तुम्हाला नेमका कसा नेता पाहिजे तर तुम्हाला भूषण वाटावे अशा नेतृत्वाची गरज आहे. पुढची पिढी घडवणारा नेता पाहिजे की, पुढची पिढी वाया घालवणार नेता पाहिजे. घरा घरात पाणी देणारा नेता पाहिजेत की घरा घरात चपटीची बॉटल देणारा नेता पाहिजे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
केंद्र सरकारची योजना आणि राज्यात सरकार आमचं तरी दुसरेच आमच्या योजनेच उद्धाटन करण्यास पुढे येतात, असं म्हणत विकासाच्या मुद्यावरून पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली.





