Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

७.७ रेटिंग अन् २४ तासांच्या घटनांवर बेतलेला थरारक चित्रपट

Trending Movie on OTT: थ्रिलर भारतीय चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास त्यात दाक्षिणात्य चित्रपट आघाडीवर असतात. दक्षिणेतील थ्रिलर चित्रपटांनी सध्या ओटीटीवर एक वेगळीच उंची गाठली आहे. त्यांची मांडणी, जबरदस्त ट्विस्ट आणि वास्तववादी अभिनय यामुळे हे चित्रपट केवळ दक्षिण भारतातच नव्हे, तर महाराष्ट्र आणि इतर भागातही आवडीने पाहिले जात आहेत.

तुम्ही या वीकेंडला एखादा दमदार थ्रिलर चित्रपट पाहायचा विचार करत असाल तर यावर्षीच थिएटरमध्ये रिलीज झालेला सिनेमा तुम्ही ओटीटीवर पाहू शकता. हा चित्रपट १२ फेब्रुवारीला ओटीटीवर रिलीज झाला आहे. नवजात बालकाच्या अपहरणाची ही कथा प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते.

‘बेबी गर्ल’ हा २०२६ मध्ये प्रदर्शित झालेला एक मल्याळम मेडिकल थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात मल्याळम सुपरस्टार निविन पॉली मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाची कथा तिरुवनंतपुरममधील एका सरकारी रुग्णालयाभोवती फिरते. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला रुग्णालयाच्या मॅटरनिटी वॉर्डमधून एका नवजात बालकाचे अपहरण होते. हा चित्रपट २४ तासांत घडणाऱ्या घटनांवर बेतलेला आहे. या चित्रपटाला आयएमडीबीवर ७.७ रेटिंग मिळाले आहे.

हेही वाचा –  ‘मुंबई महानगर क्षेत्रात ‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करा’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

निविन पॉली यात ‘सनल मॅथ्यू’ नावाच्या एका हॉस्पिटल अटेंडंटची भूमिका साकारत आहे, जो कामावर उशिरा पोहोचतो आणि या प्रकरणाचा मुख्य संशयित बनतो. पोलीस तपास आणि स्वतःचा निर्दोषपणा सिद्ध करण्यासाठी सनलने केलेला संघर्ष, तसेच या अपहरणामागचे धक्कादायक सत्य यावर आधारित हा चित्रपट आहे.

‘बेबी गर्ल’ सिनेमात निविन पॉली, लिजोमोल जोस, संगीत प्रताप आणि अभिमन्यू थिलकन हे कलाकार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अरुण वर्मा यांनी केले आहे. या चित्रपटाचे लेखन बॉबी-संजय यांनी केले आहे. या जोडीने ‘ट्रॅफिक’ आणि ‘मुंबई पोलीस’ सारखे उत्कृष्ट चित्रपट लिहिले आहेत.

‘बेबी गर्ल’ हा चित्रपट फक्त एक थ्रिलर चित्रपट नाही, तर तो मध्यमवर्गीयांच्या संघर्षांवर भाष्य करतो. एका गरीब कामगाराला कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय सहजपणे कसे दोषी ठरवले जाते हे यात दाखवण्यात आलं आहे. थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर, ‘बेबी गर्ल’ हा चित्रपट १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सोनी लिव्हवर प्रदर्शित झाला. हा चित्रपट तुम्ही हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत पाहू शकता.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button