Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

संशोधनाचा राष्ट्राच्या प्रगतीसाठी उपयोग आवश्यक : पद्मश्री डॉ. जी. डी. यादव

शिक्षण विश्व: पीसीयू मध्ये “इनोव्हेशन व उद्योजकता उत्कृष्टता केंद्र” चे उद्घाटन

पिंपरी-चिंचवड : कोणतेही संशोधन केवळ प्रयोगशाळा किंवा शैक्षणिक संकुलापुरते मर्यादित न राहता त्याचा समाज, उद्योग आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रत्यक्ष उपयोग झाला पाहिजे, असे प्रतिपादन पद्मश्री व माजी कुलगुरू डॉ. जी. डी. यादव यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी चिंचवड विद्यापीठात (पीसीयू), साते (वडगाव मावळ) येथे “इनोव्हेशन व उद्योजकता उत्कृष्टता केंद्र” (CIEE) चे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमास पद्मश्री उद्योजक प्रतापराव पवार, एआयसीटीईचे माजी अध्यक्ष डॉ. एस. एस. मंथा, महाराष्ट्र इनोव्हेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीयूचे कुलगुरू डॉ. संजय सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या वेळी डॉ. यादव यांनी संशोधनासाठी राष्ट्रीय उत्पन्नाच्या किमान ६ ते ७ टक्के निधी उपलब्ध करून देण्याची गरज अधोरेखित केली. त्यामुळे संशोधनातील गुणवत्ता, सहभाग आणि परिणामकारकता वाढून भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा –  ‘मत्स्यपालन क्षेत्राला संशोधन व आरोग्य व्यवस्थापनाची नवी दिशा’; पालकमंत्री ॲड. आशिष शेलार

डॉ. गिरीश देसाई यांनी सांगितले की, या कॉन्क्लेव्हमध्ये देशभरातील नामांकित शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, उद्योगतज्ज्ञ आणि शासकीय अधिकारी सहभागी झाले असून नवकल्पनांचा विकास, स्टार्टअप्स, संशोधनाचे व्यावसायिकीकरण आणि ज्ञानाधारित अर्थव्यवस्था यांवर सखोल चर्चा करण्यात येत आहे. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संशोधन, नवोन्मेष आणि उद्योग सहकार्य यावरील चर्चासत्रात सहभाग घेऊन मार्गदर्शन केले.

सुमारे ३०० विद्यार्थ्यांचा सहभाग…

कुलगुरू डॉ. संजय सोनवणे यांनी सांगितले की, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क, सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, आयसीटी मुंबई आणि नॅशनल केमिकल लॅबोरेटरी यांसारख्या संस्थांच्या सहभागामुळे पीसीयूला देशातील अग्रगण्य नवोन्मेष केंद्र म्हणून ओळख मिळण्यास चालना मिळाली आहे. “विद्यापीठ केवळ नोकरी शोधणारे विद्यार्थी तयार करत नाही, तर नोकरी निर्माण करणारे उद्योजक घडवत आहे,” असेही त्यांनी नमूद केले. पद्मश्री प्रतापराव पवार यांनी जागतिक सहकार्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला. कार्यक्रमात सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून १५ विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी ग्रामीण उद्योजकतेला चालना देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. ग्रामीण युवकांना प्रशिक्षण देऊन १००० उद्योजक घडविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यावरही भर देण्यात आला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button