ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रक्षाबंधनानिमित्त शाळकरी विद्यार्थ्यांकडून सीमेवरच्या सैनिकांना स्नेहविषयक राख्यांची भेट

व्ही.के. माटे हायस्कूलचा अनोखा उपक्रम; देशभक्ती, शौर्य आणि निस्वार्थ सेवेचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर

चिंचवड : रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिन या दोन राष्ट्रप्रेम जागवणाऱ्या सणांच्या निमित्ताने व्ही.के. माटे हायस्कूल, श्रीधरनगर, चिंचवड येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी सीमारेषेवर देशाच्या रक्षणासाठी सतत सज्ज असलेल्या आपल्या जवानांना स्वतः हाताने बनवलेल्या राख्या पाठवून सलाम केला.

“आपल्या बहिणीच्या पाठीशी भाऊ जसा संकटात खंबीरपणे उभा असतो, तसाच आपला जवान संपूर्ण भारतीय जनतेचे रक्षण करतो”, या भावनेतून प्रेरित होऊन विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पूर, भूकंप, वादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये आपले सैनिक जसा जीव धोक्यात घालून निस्वार्थपणे मदत करतात, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले.

हेही वाचा     :      सर्वधर्म समभाव म्हणजे नपुंसकपणा; संभाजी भिडेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. हनुमंत हुचगोळ यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन शिक्षक समन्वयक श्री. संजय खेडकर यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मोरया शिक्षण संस्थेच्या कार्यवाह, तहयात विश्वस्त तथा प्राचार्य सौ. इंद्रायणी माटे पिसोळकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सैनिकांचे योगदान, त्याग आणि देशसेवेवरील निष्ठेची प्रेरणादायक कथा सांगत देशप्रेमाचे बीज विद्यार्थ्यांच्या मनामनात रूजवले.

कार्यक्रमास उपमुख्याध्यापक श्री. दिलीप कुमावत, पर्यवेक्षिका सौ. मैत्रेयी राजे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा उपक्रम देशभक्ती, शौर्य, पराक्रम, जिद्द आणि चिकाटी यांचे संस्कार घडवणारा ठरला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button