साई मारीगोल्ड हाऊसिंग सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रदीप खंदारे पाटील यांची निवड
आगामी अडीच वर्षांसाठी नवीन पदाधिकारी मंडळाची स्थापना

पिंपरी- चिंचवड : साई मारीगोल्ड हाऊसिंग सोसायटी पिंपळे सौदागर पुणे या सोसायटीमध्ये पुढच्या अडीच वर्षांसाठी नवीन पदाधिकारी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्षपदी प्रदीप खंदारे पाटील यांची तर सचिव पदी संदीप गुंजाळ यांची निवड करण्यात आली आहे.
साई मारीगोल्ड हाऊसिंग सोसायटी मध्ये विकासात्मक उपक्रमासाठी प्रयत्नशील असणार आहे. तसेच, येणाऱ्या काळामध्ये नवनवीन योजना व उपक्रम उपलब्ध करून देण्याची ग्वाही नवनियुक्त अध्यक्ष प्रदीप खंदारे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी दिली. तसेच यावेळी पुढील अडीच वर्षांसाठी रेणुका कुलकर्णी यांची खजिनदार पदी निवड करण्यात आली.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
या सोसायटीमध्ये जवळपास 168 सदनिकाधारक राहत असून या सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाण्याचा संकल्प नवीन पदाधिकाऱ्यांनी केला आहे. यावेळी माजी अध्यक्ष अमित रसाळ यांनी व इतर माजी पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.
माजी सचिव श्रीकांत लोंढे, माजी खजिनदार चेतन मोरे तसेच स्वप्निल महाजन ,तुषार पाटील ,विष्णू पांडे ,विनोद पाटील ,विरेंद्र ताजणे , शब्बार हुसेन ,विजय बगाडे ,हर्षल पाटील ,प्रशांत पोहारे दिनेश ,अमित सोनार, प्रशांत पटील ,प्रशांत कुलकर्णी अमित गुप्ता ,जय नाईक ,सनी राजेश ,दीपक देसाई ,अतुल सिंगल, हर्षल बर्डे यांची उपस्थिती होती.