पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये पोस्टल मत मतमोजणीला सुरुवात; पुण्यात भाजपची आघाडी

Municipal Corporation Result : राज्यातील महापालिका निवडणुकीचा आज निकाल स्पष्ट होणार आहे. त्यानुसार आता पोस्टल मतदानाला सुरुवात झाली आहे. पुण्यात पोस्टल मतदानात भाजपने आघाडी घेतली आहे. पुण्यात भाजपने ३२ ठिकाणी आघाडी घेतली आहे. तर राष्ट्रवादी १४ जागांवर आघाडीवर आहे. याशिवाय शिवसेना उबाठा 0, शिवसेना शिंदे 2 आणि काँग्रेस 2 जागांवर आघाडीवर आहे.
पुणे महापालिकेच्या ४१ प्रभागांसाठी १६५ जागा आहेत. ४१ प्रभागांमध्ये ४ सदस्यीय ४० प्रभाग आहेत. प्रभाग क्रमांक ३८ हा पाच सदस्यीय आहे. या निवडणुकीत १६५ जागांसाठी १ हजार १५५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात अपक्ष उमेदवारांची संख्या २७७ आहे.
हेही वाचा – ‘भारतात सामान्य नागरिक हाच प्रशासनाचा केंद्रबिंदू’; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले मत
या निवडणुकीसाठी गुरूवारी मतदान झाले. मतमोजणीसाठी एका फेरीला साधारण अर्धा तास लागण्याची शक्यता आहे. पहिला निकाल साडेअकरापर्यंत जाहीर होऊ शकतो. तर साडेतीन-चारपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईल.




