अवैध दारू व जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा…
पिंपरी |
अवैध दारू विक्री तसेच कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला आहे. दोन्ही कारवायांमध्ये ५४ हजार ५०६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी ११ आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने ही कारवाई केली आहे. पहिली कारवाई शनिवारी (दि. १३) करण्यात आली. अंकुश चौक, ओटास्किम निगडी येथे सार्वजनिक शौचालयाच्या बाजूला काहीजण कल्याण मटका नावाचा जुगार खेळत आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार जुगार अड्यावर छापा कारवाईमध्ये पोलिसांनी २४ हजार ४०० रुपयांची रोकड, ६८ रुपया मटका साहित्य, २१ हजार २०० रुपयांचे सात मोबाईल फोन, असा एकूण ४५ हजार ६६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी शत्रुधन मेसा कठारे (वय ५०, रा. चिंचवड) आणि अन्य आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आळंदी – चाकण रोडवर केळगाव आळंदी येथे असलेल्या हॉटेल राजमुद्रा व्हेज नॉनव्हेज ज्यूस बार या हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे दारू विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या कारवाईत ७८० रुपयांची रोकड आणि ८ हजार ५८ रुपयांची देशी – विदेशी दारू, असा एकूण आठ हजार ८३८ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी रमन कैलास राणा (वय २३, रा. केळगाव, आळंदी) व इतर एका इसमावर गुन्हा दाखल झाला आहे.
वाचा- धक्कादायक! ‘मला हप्ते दे… मी इथला भाई’ म्हणत टपरीवर टोळीचा दरोडा…





