अरबी समुद्रात लष्करी हालचाली वाढल्या : भारत-पाकचा मोठा निर्णय : काहीतरी भयंकर घडत आहे ?
भारत-पाक दरम्यान पुन्हा तणाव ! : 'ऑपरेशन सिंदूर' थांबले नसल्याचा भारताचा दावा, ' नेव्हिगेशन एरिया वॉर्निंग !

मुंबई / इस्लामाबाद | भारत-पाकिस्तान दरम्यान सर्वकाही व्यवस्थित नसल्याचा प्रत्यय येत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबले नसल्याचा दावा भारताने केला असून अरबी समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर लष्करी हालचाली वाढीस लागल्या आहेत. अरबी समुद्रात प्रचंड तणाव असून काहीतरी मोठे घडणार असल्याचे संकेत लष्कराकडून देण्यात येत आहेत.
शस्त्रसंधी झाली, वस्तुस्थिती काय ?
भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्याची घोषणा करण्यात आली. दरम्यान, दोन्ही देशांतील हे युद्ध सध्या थांबवलेले असले तरी भारताने मात्र ‘ऑपरेशन सिंदूर’ रद्द केलेले नाही. सध्या ही मोहीम फक्त स्थगित करण्यात आलेली आहे. अधून मधून पाकिस्तानकडून आगळीक होत असून त्यांना ठेचण्यासाठी लष्कर सज्ज ठेवण्यात आले आहे. त्यामुळे तणाव चांगलाच वाढला आहे.
समुद्रात लष्कराच्या कवायती..
एकीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कायम असताना अरबी सागरात मोठ्या हालचाली आणि कवायती वाढल्या आहेत. नुकत्याच झालेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाचा संपूर्ण जगाने धसका घेतली होती. पहलगामवरील हल्ल्यानंतर भारातने पाकिस्तानातील दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर पाकिस्ताननेही प्रत्युत्तरादाखल भारतावर जोरदार हल्ले केले होते. दोन्ही देशांतील युद्दसदृश स्थिती लक्षात घेता, भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्याची घोषणा करण्यात आली होती. सध्या मात्र, भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश एकाच वेळी युद्धाभ्यास करत आहेत.
समुद्रात नेमके काय घडत आहे?
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना प्रदीर्घ असा समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्यामुळे आपल्यावर समुद्रातूनही हल्ला होऊ शकतो, याची दोन्ही देशांना कल्पना आहे. भारताने तर पाकिस्तानला रोखण्यासाठी अरबी समुद्रावर नजर ठेवण्यासाठी नौसेनेला मोठे बळ पुरवलेले आहे. असे असतानाच आता पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांनी ‘फायरिंग ड्रिल’ ची तयारी केली आहे. त्यामुळेच आता समुद्रातील हलचाली वाढल्या असल्याचे बोलले जात आहे.
नेव्हिगेशन एरिया वॉर्निंग…
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी ‘नेव्हिगेशन एरिया वॉर्निंग’ जारी केलेली आहे. त्यामुळे या दोन्ही देशांकडून स्वतंत्रपणए फायरिंग ड्रिल केली जाणार आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवडसह परिसरात गणेशोत्सवाची तयारी जोरात!
पाकने काय इशारा दिला ?
पाकिस्तानच्या वॉर्निंगनुसार येत्या दि. ११ ऑगस्ट रोजी सकाळी ४ ते दि. १२ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मरीन ट्रॅफिकला युद्धाभ्यास क्षेत्रापासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे. पाकिस्तानतर्फे एक तर भारताकडून अशा तीन वॉर्निंग देण्यात आल्या आहेत.
भारताची फायरिंग ड्रिल कधी ?
भारताने दिलेल्या वॉर्निंगमध्ये ओखा, पोरबंदर, मोरमुगाओ या भागातील मरीन ट्रॅफिकला खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. ओखा किनाऱ्यासाठी जारी करण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार भारताचे नौदल दि. ११ ऑगस्टरोजी ११.३० ते १.३० वाजेपर्यंत, पोरबंदर समुद्र किनाऱ्यावर जारी करण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार दि. १२ ऑगस्ट रोजी रात्री १२.३० वाजेपासून ते संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत तसेच मोरमुगाओ किनाऱ्यावर जारी करण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार दि.१३ ऑगस्ट रोजी दीड वाजेपासून ते संध्याकाळच्या सहा वाजेपर्यंत ‘फायरिंग ड्रिल’ केली जाईल. त्यामुळे या काळात सर्वच मरीन ट्रॅफिकला या भागापासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
‘ही’ वॉर्निंग म्हणजे नेमकं काय ?
‘ नेव्हिगेशन एरिया वॉर्निंग’ ही संबंधित भागातून जाणारे व्यापारी जहाज, प्रवासी जहाज यांच्यासाठी देण्यात येते. समोर धोका आहे, असा त्याचा अर्थ आहे. या वॉर्निंग दिल्यानंतर कोणत्याही जहाजाने किंवा आकाशातून विमानानेही ‘फायरिंग ड्रिल’ च्या संबंधित भागातून जाऊ नये, असे सूचित केले जाते. पहलगामवर हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानने गडबडीत अशाच प्रकारची वॉर्निंग जारी केली होती. भारत समुद्रमार्गे आपल्यावर हल्ला करू शकतो, या भीतीपोटी ही वॉर्निंग जारी करण्यात आली होती. दरम्यान, आता भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश एकमेकांच्या सागरी हद्दीत ‘फायरिंग ड्रिल’ करत आहेत. त्यामुळे तणावात चांगलीच वाढ झाली आहे.
पाकिस्तानने मारली पायावर कुऱ्हाड!
पाकिस्तानने भारतासाठी त्यांचे हवाई क्षेत्र बंद केले होते. दरम्यान, आता पाकिस्तानने भारताविरोधात घेतलेला हा निर्णय त्यांच्याच अंगलट आला आहे. त्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू जलवाटप करार स्थगित केला. तसेच, पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरांवर येण्यास मज्जाव केला. या घटनेला आता बरेच दिवस झालेत. पाकिस्तानने त्यांचे हवाई क्षेत्र भारतासाठी बंद केल्यामुळे रोज शंभरपेक्षा जास्त विमानोड्डाण प्रभावित झाले. त्यामुळे ४.१० अब्ज पाकिस्तानी रुपयांचे (साधारण १२७कोटी भारतीय रुपये) नुकसान झाले आहे. इतर अनेक बाबतीत ही पाकिस्तानचे प्रचंड नुकसान झाले आहे, त्यांना आता पश्चाताप होत आहे.





