Ganesh Utsav 2023 : गणेशोत्सवासाठी PMPML च्या बसेस रात्रभर धावणार
![PMPML buses will run throughout the night for Ganeshotsav](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/PMPML-bus-2-780x470.jpg)
पुणे : गणेश उत्सव सुरु होण्यास तीन दिवस राहिले आहे. सर्वत्र गणरायाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे. पुणे शहरात गणेशोत्सवासाठी प्रशासनाकडून तयारी केली जात आहे. गणेश उत्सवासाठी पीएमपीएल जादा बसेस सोडणार आहे. एकूण २७० जादा बसेस सोडण्यात येणार आहे. १९ ते २८ सप्टेंबर दरम्यान शहरात जादा बसेस धावणार आहेत. तसेच गणेशोत्सव दरम्यान पीएमपीएमएलच्या बसेस रात्रभर सेवा देणार आहे.
पुणे शहरात गणेशोत्सवात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी बंदोबस्तात वाढ करण्यात येणार आहे. यासाठी पुणे शहरात ७००० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहे.
हेही वाचा – महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा कमबॅक; हवामान विभागाचा अंदाज
दरम्यान, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिष्ठापना सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते केली जाणार आहे. १९ सप्टेंबर रोजी १० वाजून २३ मिनिटांनी दगडूशेठ गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यापूर्वी सकाळी साडेआठ वाजता श्रींच्या आगमन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. दगडूशेठ मंडळाने यंदा आयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या प्रतिकृती बनवली आहे.