TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वाहन खरेदीत पिंपरी-चिंचवडकरांनी साधला ‘मुहूर्त’

पिंपरी: पिंपरी-चिंचवडकरांनी दसरा खरेदीच्या मुहूर्तावर वाहन खरेदीला पसंदी दिली आहे. ०१ सप्टेंबर ते ०५ ऑक्टोंबर २०२२ या कालावधीत दुचाकी, चारचाकी तसेच, इतर वाहने मिळून १४ हजार ५६७ वाहन खरेदीची नोंद पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात झाली आहे. त्या माध्यमातून ‘आरटीओ’च्या तिजोरीत ६९ कोटी ७९ लाख रुपये महसुलाची भर पडली.
दुचाकी, कुटुंबासाठी मोटार आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून वाहन खरेदी जोरदार झालेली आहे. बहुतांश जणांनी मुहूर्त साधण्यासाठी पंधरा दिवसांपूर्वी बुकिंग करून ठेवले होते. नवीन वाहनांना सर्वाधिक पसंती असल्याचे दिसून आले. वाहन खरेदीमध्ये ॲडाप्टेड व्हेइकल, ॲग्रीकल्चर ट्रॅक्टर, रुग्णवाहिका, आटिक्युलेटेड व्हेइकल, बस, कॅश व्हॅन, कन्स्ट्रक्शन इक्पिमेंट व्हेइकल, क्रेन माउंटेड व्हेइकल, डंपर, अर्थ मूव्हींग इक्पिमेंट, इ-रिक्षा, एक्साव्हेटर, फाइल टेंडर, फोर्क लिफ्ट, स्कूटर साइड कार, मोटाराइज्ड सायकल, ट्रेलर, व्हिंटेज मोटारीं अशा विविध प्रकारच्या वाहनांची खरेदी करण्यात आली.
दसरा मुहूर्तावर झालेली वाहन खरेदी :
प्रकार संख्या
तीन चाकी मालवाहतूक : १२२
तीन चाकी प्रवासी रिक्षा : २८३
मोटार : ४२९३
मोटार सायकल : ८४४८
मालवाहतूक : ९३५
ट्रॅक्टर : १६६
मोटार कॅब : १६३
बस : ६१
व्हॅन : २१
इतर : ७५
एकूण वाहने : १४, ५६७
एकूण उलाढाल : ६९ कोटी ७९ लाख १९ हजार १८८.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button