Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड-पुणे शहरातील सर्वात मोठा रावण दहन सोहळा पिंपळे सौदागरमध्ये

नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशनच्या वतीने आयोजन

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील सर्वात मोठा रावण दहन कार्यक्रम पिंपळे सौदागरमध्ये होणार आहे. नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशनच्या वतीने या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार (दि.२४) सायं. ६ वाजता विजयादशमी निमित्ताने पिंपळे सौदागर येथील गोविंद यशदा चौक, नेक्सा शोरूम समोर सर्वात मोठ्या रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यासाठी यंदा १२० फूट उंचीच्या रावणाचा प्रतीकात्मक पुतळा उभारण्यात येणार आहे. रावणाच्या पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, सोमवारी दुपारपर्यंत पुतळा उभारण्यात येणार आहे. बांबू, काठ्या, सुतळी, पुठ्ठे, काथ्या, खिळे, दोरी आदी साहित्यांचा वापर करून रावणाची प्रतिकृती तयार केली जात आहे. या दिवशी उपस्थित सर्व नागरिकांना अनेक उपक्रम आणि विशेष अतिथींसह एक अविस्मरणीय अनुभव येणार आहे.

हेही वाचा – EWS वरून मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले..

सुनील अनिल तिलकधारी, हिसार हे या उत्सवाचा भाग होण्यासाठी हरियाणातून प्रवास करून येणार आहेत. तसेच या कार्यक्रमात टाईम पास-३ फेम अभिनेत्री हृता दुर्गुळे, तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री अक्षया देवधर आणि प्रसिद्धी दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे या प्रमुख पाहुण्यांचा समावेश असेल. चेतन अग्रवाल, नीतू अग्रवाल आणि आरजे अक्षय या कार्यक्रमाचे अँकरिंग करणार आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button