breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

EWS वरून मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले..

मुंबई : मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मराठ्यांच्या नादाला लागू नका, असा इशारा मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे. तसेच त्यांनी EWS वरूनही जोरदार हल्लाबोल केला.

मनोज जरांगे म्हणाले, एक नवीन पिल्लु सकाळी आणलंय. तुम्ही वेडे समजता का आम्हाला? ईडब्ल्यूएस कोणी मागितलंय? कोणाला फायदा झाला आहे? सांगा एखादं नाव. मग कशाला आकडे मोडता? तुम्ही गणितशास्त्राचे मास्तर होता का? सतत सांगायला लागलेत की ईडब्ल्यूएसचा फायदा झाला.

हेही वाचा – जिल्हास्तरीय महिला कबड्डी स्पर्धेत शिवाजी उदय संघाचा प्रथम क्रमांक

बाकींच्यानाही सारथीसारख्या संस्था आहेत हे सांगितलं का? ईडब्लूएस दाखवालयला लागलेत, तसंच इतरांनाही आरक्षण आहे. त्याची आकडेमोड केली का? नाही केली. मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय की जाहिराती छापायला पैसे आमचे, अर्धा कॉलम छापून आणणार ते आणि आम्हाला सांगणार काय फायदा झाला? आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारने वेळकाढूपणा करू नये. सरकारने १ महिना मागितला आम्ही ४० दिवस दिले, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button