Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्वच्छ शहरासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचे ‘थ्री आर’ सेंटर

आरोग्य विभाग राबवत आहे अनोखा उपक्रम

पिंपरी | पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आणि शहरातील कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरात विविध ठिकाणी ‘थ्री आर’ (Reduce, Reuse, Recycle) केंद्र उभारण्यात आले आहेत.

महापालिकेच्या ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग क्र. १० मधील नाना-नानी पार्क, कापसे उद्यान, मोरवाडी येथे ‘ओंजळ’ या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने ‘थ्री आर’ केंद्र सुरु करण्यात आले आहे. नागरिकांनी घरामध्ये वापरण्यायोग्य पण सध्या वापरात नसलेल्या वस्तू या केंद्रांमध्ये जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या उपक्रमामुळे एकीकडे गरजूंना उपयोगी वस्तू मिळतात, तर दुसरीकडे घरगुती कचऱ्याचे प्रमाणही लक्षणीय प्रमाणात कमी होते. या केंद्रांमध्ये इलेक्ट्रिक वस्तू, पुस्तकं, भांडी, खेळणी, पादत्राणे, कपडे इत्यादी वस्तू जमा करता येतात. अशा वस्तूंचा पुनर्वापर किंवा पुनरुज्जीवन करून त्यांचा चांगल्या पद्धतीने उपयोग केला जातो.

हेही वाचा   :    इंद्रायणी- पवना संवर्धनासाठी सरकार कटीबद्ध!

‘थ्री आर’ म्हणजे काय?

रिड्यूस (Reduce) – वस्तूंचा कमीतकमी वापर
रीयूज (Reuse) – वस्तूंचा पुनर्वापर
रिसायकल (Recycle) – वस्तूंचे पुनर्चक्रीकरण
या माध्यमातून पर्यावरण रक्षणाबरोबरच समाजातील गरजूंना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून राबविण्यात आलेला ‘थ्री आर’ सेंटर उपक्रम अतिशय महत्त्वाचा असून, स्वच्छ सुंदर शहराबरोबर अनेक गरजूंना त्यामुळे उपयोगी वस्तूंची मदत होणार आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी या समाज उपयोगी उपक्रमात सहभागी होऊन पिंपरी चिंचवड महापालिकेस सहकार्य करावे.

– विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.

 

महानगरपालिका आरोग्य विभाग तसेच सामाजिक संस्थेच्या माध्यमातून राबविलेला ‘थ्री आर’ सेंटर उपक्रम अतिशय स्तुत्य असून, नागरिकांनी आपल्या घरातील वापराविन पडून असलेल्या वस्तू ‘थ्री आर’ सेंटर जमा करून सामाजिक उत्तरदायित्व पार पाडावे.

– सचिन पवार, उप आयुक्त, आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button