Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

हिंजवडी आयटी पार्कची वाहतूक सुकर करण्यासाठी पोलिसांसोबत ‘अनक्लॉग हिंजवडी आयटी पार्क’ मोहिमेतील याचिकाकर्त्यांची बैठक

वाहतूक कोंडीमुक्त हिंजवडीसाठी नागरिक, पोलीस आणि महापालिकेचा संयुक्त पुढाकार!

पिंपरी-चिंचवड | हिंजवडी आयटी पार्कमधील वाढती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ‘अनक्लॉग हिंजवडी आयटी पार्क’ (#UnclogHinjawadiITPark) या नागरिक मोहिमेतील याचिकाकर्ते सचिन लोंढे आणि सचिन गुणाले यांनी नुकतीच पिंपरी-चिंचवड पोलिसांसोबत सखोल चर्चा केली. पिंपरी-चिंचवड पोलिस मुख्यालयात सकाळी ११ वाजता झालेल्या या बैठकीस अनेक वरिष्ठ पोलीस व महापालिका अधिकारी उपस्थित होते. ही बैठक दोन तास चालली.

बैठकीस पोलीस आयुक्त (CP) विनयकुमार चौबे, अतिरिक्त पोलीस आयुक्त (Addl CP) सारंग अव्हाड, पोलीस उपायुक्त (DCP) विवेक पाटील, तसेच एसीपी सतीश नंदुरकर, पोलीस निरीक्षक सोनवणे आणि थोरात उपस्थित होते. महापालिकेचे अधिकारी बापू गायकवाड आणि कार्यकारी अभियंता (EE) सुनील पवार यांनीही सहभाग घेतला. EE पवार यांनी वाहतूक समस्या समजून घेण्यासाठी केलेल्या सविस्तर सर्वेक्षणाचा आढावा बैठकीत मांडण्यात आला.

यावेळी, याचिकाकर्ते आणि अधिकाऱ्यांनी मिळून हिंजवडी व वाकड परिसरातील दहा प्रमुख वाहतूक ठिकाणांची पाहणी केली. यामध्ये वाकड-हिंजवडी पूल, साता माळी मंदिर परिसर, इंडियन ऑइल चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भुजबळ चौक, फिनिक्स मॉल रोड, वेस्टर्न अव्हेन्यू सोसायटी, मिसिंग लिंक रोड, काला खडक सिग्नल आणि डांगे चौक यांचा समावेश होता.

हेही वाचा        :        वेस्ट इंडिजविरूद्ध कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, रिषभ पंत, करुण नायरला डच्चू

प्रत्येक ठिकाणी होणाऱ्या वाहतूक अडचणींचा सखोल आढावा घेऊन विविध उपाययोजना सुचवण्यात आल्या. यामध्ये सिग्नल टाइमिंगमध्ये बदल, अडथळे दूर करणे, सुसूत्रित वाहतूक नियंत्रण, रस्त्यांची पुनर्रचना यासारख्या गोष्टींवर भर देण्यात आला.

यावेळी वेस्टर्न अव्हेन्यू सोसायटीत आयोजित नवरात्र पूजेसाठी सोसायटीने सीपी चौबे यांना आमंत्रित केले होते. त्यांनीही उपस्थित राहून नागरिकांच्या विनंतीचा मान राखला. सोसायटीचे अध्यक्ष सुधाकर दिवाण आणि गोडबोले यांनी पोलिसांचे आभार मानले. बैठकीच्या शेवटी याचिकाकर्त्यांनी ही चर्चा सकारात्मक वातावरणात पार पडल्याचे सांगितले. वाहतूक कोंडीमुक्त हिंजवडीसाठी पोलिसांची आणि महापालिकेची सहकार्याची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. आयुक्त विनयकुमार चौबे यांनी या भागाला स्वतः तिसऱ्यांदा भेट दिली असून, वाहतूक समस्यांवर उपाय काढण्याची त्यांची व PCPM टीमची वचनबद्धता यावेळी अधोरेखित झाली.

“हिंजवडीतील वाहतूक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी नागरिक, पोलिस आणि महापालिकेने एकत्र येणे ही काळाची गरज आहे. या बैठकीत पोलिसांनी सकारात्मक आणि सक्रिय भूमिका घेतली, हे आम्हाला आशादायक वाटते. आम्ही फक्त तक्रार करणारे नागरिक नाही, तर उपाय सुचवणारे भागीदार आहोत.”

– सचिन लोंढे, याचिकाकर्ते, #UnclogHinjawadiITPark मोहिम

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button