विद्यार्थी झाले वारकरी!
शिक्षण विश्व: दिघीमध्ये मंजुरीबाई विद्यालयात पार पडला पालखी सोहळा

पिंपरी चिंचवड| प्रतिनिधी
दिघीतील मंजुरीबाई विदयाल्यात पालखी सोहळा उत्साहात पार पडला. आकर्षक फुलांनी सजवलेली पालखी आणि त्यामध्ये विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्ती तसेच संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका ठेवण्यात आल्या होत्या.
शाळेतील विद्यार्थी, शिक्षक पारंपारिक वारकरी वेशभूषेत आले होते. विद्यार्थिनी नऊवारी साडी तसेच डोक्यावर तुळस घेऊन सहभागी झाल्या होत्या. विद्यार्थ्यांनी वारकरी वेशात टाळ, वीणा हाती घेतले होते. ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या जयघोषात शाळा व परिसर दुमदुमुन गेला होता. शाळेपासून गणेश मंदिर शिवनगरी कॉलनी, महादेव नगर पर्यंत दिंडी काढण्यात आली. शाळेत आल्यावर सर्व विद्यार्थी तसेच शिक्षकांनी फुगडीचा आनंद लुटला. विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षिकांनी गोल रिंगण करून, ‘ज्ञानोबा- तुकाराम’च्या ठेक्यावर पालखीचा आनंद घेतला. या पालखी सोहळ्यात पूर्व प्राथमिक,माध्यमिक व बालवाडी चे सर्व विद्यार्थी उत्साहात सहभागी झाले होते.
हेही वाचा : त्रिभाषा सूत्राबाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी घोषणा
पालखीचे पूजन संस्थेच्या विश्वस्त कविता भोंगाळे यांनी केले.तसेच यावेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्रीकांत राहणे, माध्यमिक शीतल माने तसेच बालवाडी च्या वेदिका भोसले व इतर सर्व शिक्षक वृंद व पालक उपस्थित होते.