ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चऱ्होलीत गांजा विक्री प्रकरणी एकास अटक; अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

पिंपरी | अंमली पदार्थ विरोधी पथकाने चऱ्होली परिसरात छापा टाकून गांजाची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या एका तरुणाला अटक केली. ही कारवाई बुधवारी (११ मार्च) मध्यरात्री आझादनगर येथील एका पान शॉपसमोर करण्यात आली.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत जाधव यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी राजेंद्र विष्णू आदुडे (३९, दाभाडे वस्ती, चऱ्होली; मूळ गाव छत्रपती संभाजीनगर) याला अटक केली असून मलकेकर (भाटनगर, पिंपरी) याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा        :            हार्दिक पांड्याविरोधात तक्रार दाखल, तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजेंद्र हा रस्त्याच्या कडेला सार्वजनिक ठिकाणी गांजा विक्रीसाठी उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याच्याकडून २२ हजार ८०० रुपये किमतीचा २४० ग्रॅम गांजा, मोबाईल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत हा गांजा त्याने पिंपरीतील मलकेकर नावाच्या व्यक्तीकडून विक्रीसाठी आणल्याचे सांगितले. दिघी पोलीस तपास करत आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button