वाकडच्या विकासासाठी आता “आमदार आपल्या दारी”
चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांचा नागरी सत्कार सोहळा

पिंपरी- चिंचवड | अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये वाकड परिसरात “आमदार आपल्या दारी” हा उपक्रम राबवून प्रलंबित असलेले सर्व प्रश्न मार्गी लावणार आहे. वाकड परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहे असे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले.
वाकड रेसिडेंट्स डेव्हलपमेंट अँड वेलफेअर असोसिएशनतर्फे महिला दिनानिमित्त चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या नागरी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आमदार शंकर जगताप म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला वाकड दत्तमंदिर ४५ मीटर रस्त्याचे काम सुरू आहे. सध्याच्या ३ लेन मध्ये आणखी एक लेन वाढवण्यात येऊन १८ मीटरचे ३० मीटर कॅरेज वे सुरू करणार आहे . शॉनेस्ट टॉवर येथील रस्त्याचा अडथळा दूर करण्यासाठी प्रयत्न करून तो रस्ता कार्यन्वित करण्याबाबत आमदार जगताप यांनी आश्वासन दिले.
हेही वाचा : अतिरिक्त जलस्त्रोत : कालवा समितीत डावलले; जलसंपदा मंत्र्यांनी सावरले!
वाकड मधील २० लक्ष लिटर पाण्याची टाकीतुन वाकड शहरवासियांना पाणी पुरवठा लवकरच काही दिवसात सुरू होईल. हरित पिंपरी चिंचवड साठी वृक्षारोपण अभियान सर्वत्र राबवत असून त्याच अनुषंगाने दत्त मंदिर रोड वर वृक्षारोपण करण्यात येईल. तसेच “ब” दर्जा असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांना आमदार निधीतून रेन वॉटर हार्वेस्टिंग, घनकचरा व्यवस्थापन, सौर ऊर्जा प्रकल्प, ईव्ही चार्जिंग स्टेशन, रस्ते व पदपथ सुधारणा आणि व्यायाम तसेच हरित क्षेत्राच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे असा विश्वास सोसायटी धारकांना दिला.
कार्यक्रमासाठी यावेळी माजी नगरसेवक विनायक गायकवाड, आरतीताई चोंधे, विशाल कलाटे, पुणे जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य भारती विनोदे, राम वाकडकर, मंडल अध्यक्ष प्रसाद कस्पटे, रामदास कस्पटे, श्रीनिवास कलाटे ,निमंत्रक सचिन लोंढे, तेजस्विनी सवाई उपस्थित होते.